घरक्रीडासंघात स्थान न दिल्याने भारताचा 'हा' अष्टपैलू खेळाडू इंग्लंडमधून खेळणार

संघात स्थान न दिल्याने भारताचा ‘हा’ अष्टपैलू खेळाडू इंग्लंडमधून खेळणार

Subscribe

दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि आयर्लंड (Ire-Land) विरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ (Indian Cricket Team) इंग्लंड विरुद्ध मालिका खेळणार आहे. वनडे आणि टी-२० मालिका भारत आणि इग्ंलड यांच्यात होणार आहे.

दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि आयर्लंड (Ire-Land) विरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ (Indian Cricket Team) इंग्लंड विरुद्ध मालिका खेळणार आहे. वनडे आणि टी-२० मालिका भारत आणि इग्ंलड यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी खेळाडूंची (Players) निवड करण्यात आली. मात्र, या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा अष्टपैलू (Allrounder) खेळाडू कृणाल पांड्याला स्थान दिले नाही. त्यामुळे कृणाल पांड्याने इंग्लंडमधून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. (krunal pandya to play royal london odi cup in england due to not getting selected in team india )

इंग्लंडमध्ये जाऊन खेळणार

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दिवसेंदिवस वाढत्या स्पर्धेमुळे कृणाल पांड्या (Krunal Pandya) बाहेर आहे. त्यामुळे आता तो इंग्लंडमध्ये जाऊन खेळणार आहे. फॉर्ममध्ये परतण्यासाठी तो रॉयल लंडन वनडे चॅम्पियनशीपमध्ये (London ODI Championship) खेळताना दिसणार आहे. ही स्पर्धा २ ते २३ ऑगस्ट या कालावधीत खेळवली जाणार आहे.

कृणालबाबत वारविकशायरचे क्रिकेट डायरेक्टर पॉल फारब्रेस म्हणालेकी, ‘कृणाल आमच्या क्लबसाठी शानदार खेळाडू ठरेल. मला त्याचं एजबॅस्टनमध्ये स्वागत करताना आनंद होत आहे. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचाही अनुभव आहे.’

- Advertisement -

कृणाल पांड्याने या स्पर्धेसाठी वारविकशायरसोबत करार केला आहे. पांड्याशिवाय वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) लँकशायरकडून खेळताना दिसणार आहे. दरम्यान, कसोटी मालिकेसाठी सध्यस्थितीत भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर (India vs England) आहे. त्यानंतर वनडे आणि टी-२० मालिका खेळवली जाणार आहे.

इंग्लंडविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण

२०२१ साली कृणाल पांड्याने इंग्लंडविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केले होते. कृणालने भारतीय संघाकडून ५ वनडे आणि १९ टी-२० सामना खेळले आहेत. तसेच, आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळताना दिसला. आपली पहिलीच आयपीएल खेळणारी लखनऊ या मोसमात प्ले-ऑफपर्यंत पोहोचली.

मोलाची भूमिका

लखनऊकडून खेळण्याआधी कृणाल मुंबई इंडियन्सच्या संघाचा महत्त्वाचा खेळाडू होता. मुंबईला चॅम्पियन बनवण्यात कृणाल पांड्याने मोलाची भूमिका बजावली होती. आयपीएल २०१७ च्या फायनलमध्ये कृणालने मॅच विनिंग खेळी केली होती आणि मुंबईला आयपीएलचे जेतेपद जिंकवून दिले होते.


हेही वाचा – बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिलेचे मुंबईत स्वागत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -