घरक्रीडाआयसीसी वनडे रँकिंग टॉप - १० मध्ये पहिल्यांदाच कुलदीप यादव

आयसीसी वनडे रँकिंग टॉप – १० मध्ये पहिल्यांदाच कुलदीप यादव

Subscribe

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं बुधवारी दिलेल्या बॉलर्सच्या यादीमध्ये कुलदीप यादवनं ६ वं स्थान प्राप्त केलं आहे.

इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या् तीन वनडे मॅचच्या सिरीजमध्ये चांगली कामगिरी करणारा भारताचा चायनामॅन बॉलर कुलदीप यादवनं पहिल्यांदाच आयसीसी वनडे रँकिंगमध्ये टॉप – १० मध्ये जागा मिळवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं बुधवारी दिलेल्या बॉलर्सच्या यादीमध्ये कुलदीप यादवनं ६ वं स्थान प्राप्त केलं आहे. तर इंग्लंडचा बॅट्समन जो रूटदेखील पहिल्यांदाच दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

कुलदीपनं १४ व्या स्थानावरून घेतली झेप

तीन वनडे मॅचच्या सिरीजमध्ये इंग्लंडनं भारताला २-१ नं हरवून लागोपाठ मॅच जिंकण्यावर रोख लावला. परंतु कुलदीपनं मात्र या सिरीजमध्ये एकूण ९ विकेट्स आपल्या नावावर केल्या. ज्यामध्ये ट्रेंटब्रिजमधील मॅचच्या सहा विकेट्सचा समावेश आहे. या मॅचमुळंच कुलदीपनं १४ व्या स्थानावरून ८ स्थान वर अर्थात ६ व्या स्थानावर झेप घेतलेली आहे. कुलदीपची जादू दुसऱ्या मॅचमध्ये चालू शकली नसली तरीही वैयक्तिक विक्रमामुळं त्यानं आयसीसीच्या क्रमवारीमध्ये चांगलीच झेप घेतली आहे. टॉप – १० च्या यादीमध्ये समावेश झालेला कुलदीप हा दुसरा भारतीय बॉलर आहे. जसप्रीत बुमराह अजूनही पहिल्याच स्थानावर आहे. तर यझुवेंद्र चहलच्या ८ व्या स्थानाला धक्का बसला असून यझुवेंद्र दोन स्थान खाली अर्थात १० व्या क्रमांकावर आला आहे.

- Advertisement -

बॅट्समनमध्ये कोहली पहिल्या क्रमांकावर

रूटनं दुसऱ्या स्थानावर झेप घेतली असून अजूनही भारतीय कॅप्टन विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. रूटनं दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये शतक झळकवल्यामुळं ६ व्या स्थानावरून २ ऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर रोहित शर्मानं आपलं ४ थं स्थान टिकवलं आहे. शिखर धवनदेखील १० व्या स्थानावर कायम आहे.

आयसीसी वनडे रँकिंगमधील टॉप – १० बॉलर

१. जसप्रीत बुमराह
२. राशीद खान
३. हसन अली
४. ट्रेन्ट बोल्ट
५. जोश हेजलवूड
६. कुलदीप यादव
७. इमरान ताहीर
८. आदिल राशीद
९. कागिसो रबाडा
१०. यझुवेंद्र चहल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -