घरक्रीडाकुलदीप यादवनं रचला रेकॉर्ड

कुलदीप यादवनं रचला रेकॉर्ड

Subscribe

इंग्लंडला आपल्या बोटावर नाचवणारा कुलदीप यादव हा जगातील पहिला लेफ्ट आर्म स्पिनर बनला आहे. इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील सर्वात पहिल्या खेळाडूचा मान कुलदीप यादवला मिळाला आहे.

ट्रेंटब्रिजमध्ये खेळवण्यात आलेल्या इंग्लंड विरुद्ध भारताच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये विराट सेनेनं दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. मात्र या मॅचचा खरा ‘हिरो’ ठरला तो कुलदीप यादव. कुलदीपनं वनडे क्रिकेटमध्ये आपल्या लेफ्ट आर्म स्पिनिंगनं एक नवी परिभाषाच लिहिली आहे. मागच्या वेळीदेखील आफ्रिकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी जबरदस्त स्पिन्सची कमाल दाखवत धूळ चारली होती. यावेळी हीच वेळ इंग्लंडची असण्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे. या मॅचमध्ये कुलदीपनं नवा रेकॉर्ड रचला असून शेन वॉर्न आणि मुरलीलादेखील अशी कामगिरी करता आलेली नाही.

काय रचला कुलदीपनं इतिहास?

कुलदीप यादवनं १० ओव्हर्समध्ये २५ रन्स देत ६ विकेट्स घेतल्या. यापूर्वी इंग्लंडच्या मैदानावर कोणत्याही स्पिनर्सला ही कामगिरी करता आलेली नाही. इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील सर्वात पहिल्या खेळाडूचा मान कुलदीप यादवला मिळाला आहे. आतापर्यंत इंग्लंडच्या मैदानावर ज्या बॉलर्सनी ६ विकेट्स घेतल्या आहेत, ते सर्व फास्ट बॉलर्स होते. इंग्लंडमध्ये सर्वात चांगला स्पिन करणाऱ्या स्पिनर्समध्ये कुलदीपचा चौथा क्रमांक लागला आहे. पहिल्या क्रमांकावर पाकिस्तानच्या वकार युनिसचं नाव असून त्यानं १० ओव्हर्समध्ये ३६ रन्स देत ७ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

- Advertisement -

हा रेकॉर्ड बनवणारा पहिलाच लेफ्ट आर्म स्पिनर

इंग्लंडला आपल्या बोटावर नाचवणारा कुलदीप यादव हा जगातील पहिला लेफ्ट आर्म स्पिनर बनला आहे. केवळ २५ रन्स देऊन त्यानं ६ विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड बनवला. यापूर्वी लेफ्ट आर्म स्पिनरचा हा रेकॉर्ड मुरली कार्तिकच्या नावे होता. त्यानं २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २७ रन्स देऊन ६ विकेट्स घेतल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -