घरक्रीडादानशूर,देशभक्त एम्बापे

दानशूर,देशभक्त एम्बापे

Subscribe

खेळाडू किलियन एम्बापेने त्याला मिळालेली सर्व रक्कम प्रिमियर्स डी कोर्डीस या सेवाभावी संस्थेला दान करणार असल्याची घोषणा केली आहे.

नुकताच फुटबॉल विश्वचषक रशियात पार पडला. हा विश्वचषक फ्रान्सने आपल्या नावे केला. त्यामुळे फ्रान्सच्या खेळाडूंना बक्षिसाच्या रूपात बरीच रक्कम मिळाली. या विश्वचषकात फ्रान्ससाठी स्टार ठरलेला खेळाडू किलियन एम्बापेने त्याला मिळालेली सर्व रक्कम प्रिमियर्स डी कोर्डीस या सेवाभावी संस्थेला दान करणार असल्याची घोषणा केली आहे. ही संस्था दिव्यांग क्रीडापटूंच्या विकासासाठी काम करते. एम्बापेला विश्वचषकातून बक्षीस स्वरूपात जवळपास ५००,००० डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास साडेतीन करोड इतकी रक्कम मिळाली होती. तो ही पूर्ण रक्कम दिव्यांग क्रीडापटूंना दान करणार आहे.

या त्याच्या नेक कामाबद्दल एम्बापे म्हणाला, ” मला माझ्या देशासाठी खेळायला मिळते हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे यासाठी बक्षीस किंवा पैसे घेणे मला पटत नाहीत. म्हणून मी ही रक्कम दान करत आहे. याआधीही एम्बापेने विश्वचषकातील प्रत्येक सामन्यानंतर मिळणारी रक्कम दान केली होती. विश्वचषकातील एका सामन्याची त्याची कमाई २०,००० युरोस म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास १६ लाख इतकी होती.
एम्बापेच्या या कार्यामुळे सर्व जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -