घरक्रीडारियाल माद्रिद-बार्सिलोना सामन्यात बरोबरी

रियाल माद्रिद-बार्सिलोना सामन्यात बरोबरी

Subscribe

ला लिगा फुटबॉल स्पर्धा

रियाल माद्रिद आणि बार्सिलोना या दोन स्पेनमधील बलाढ्य संघांतील ला लिगा स्पर्धेचा सामना गोलशून्य बरोबरीत संपला. एल क्लासिको म्हणून ओळखल्या जाणार्‍या या सामन्याकडे जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष होते. मात्र, दोन्ही संघांच्या आघाडीच्या फळींना अपेक्षित खेळ करता आला नाही. ला लिगाच्या यंदाच्या मोसमात दोन्ही संघांनी आतापर्यंत १७ सामने खेळले असून त्यांचे ३६-३६ गुण आहेत. मात्र, सरस गोल सरासरीमुळे बार्सिलोनाचा संघ अव्वल स्थानावर आहे.

एल क्लासिको गोलशून्य बरोबरीत संपण्याची ही २००२ नंतरची पहिलीच वेळ होती. या सामन्यात दोन्ही संघांना गोल करण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. रियाल माद्रिदने दोन वेळा पेनल्टीसाठी अपील केली, पण रेफ्रीने दोन्ही वेळा ती नाकारली. रेफ्रीच्या या निर्णयाबाबत सामन्यानंतर रियालचा कर्णधार सर्जिओ रॅमोसने नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

आम्ही या सामन्यात खूप चांगला खेळ केला. आम्हाला या सामन्यात दोन पेनल्टी मिळाल्या पाहिजे होत्या. मात्र, आता आम्ही याबाबत काहीही करु शकत नाही, असे रॅमोस म्हणाला. रॅमोसच्या संघाने या सामन्यात एकूण १२ फटके गोलवर मारले. दुसरीकडे बार्सिलोनाकडून लिओनेल मेस्सीव्यतिरिक इतर खेळाडूंनी निराशाजनक खेळ केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -