मुंबई: आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेच्या (ICC ODI World Cup 2023) अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. या पराभवाचा खेळाडूंना नाही तर भारतीय चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. भारतीय संघ या विश्वचषकात पहिल्यांदाच ऑलआऊट झाला. भारताला मोठी धावसंख्याही उभारता आली नाही. त्याचाच फायदा ऑस्ट्रेलियाला झाला आणि त्यानी जगज्जेते पद पटकावलं. (Ladyluck Same thing happened with Mahendra singh Dhoni and Ricky Ponting England captain Eoin Morgan )
लेडीलक का कमाल
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने लग्न करताच दुसऱ्याच वर्षी वर्ल्डकप जिंकला आहे. 2022 मध्ये पॅट कमिन्स त्याच्या प्रेयसीसोबत विवाह बंधनात अडकला. बेकी बोस्टनसोबत कमिन्सचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. जुलै 2022 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. यानंतर जवळपास सव्वा वर्षांनी कमिन्सच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियानं वर्ल्डकप जिंकला. असाच योगायोग याआधी रिकी पॉटिंग, महेंद्रसिंह धोनी आणि इयन मॉर्गनसोबत जुळून आला आहे.
याआधी या कर्णधारांसोबतही असंच घडलं
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगनं 2002 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजेच 2003 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली कांगारुंनी विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. त्यांनी अंतिम सामन्यात भारताचा 125 धावांनी पराभव केला. महेंद्रसिंग धोनीने साक्षी सिंग रावतसोबत 2010 मध्ये लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये भारतानं एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्यावेळी धोनीकडे संघाची धुरा होती. इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गननं 2018 मध्ये त्याच्या प्रेयसीसोबत लग्नगाठ बांधली. 2018 मध्ये इंग्लंडचा संघ विश्वविजेता ठरला.
असाच योगायोग कमिन्ससोबतही जुळून आला आहे. आयसीसीच्या दोन स्पर्धा एकाच वर्षात जिंकणारा पहिला कर्णधार ठरण्याचा मानही त्यानं पटकावला आहे. याआधी त्याने वर्ल़्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यावेळीही अंतिम सामना भारतासोबत होता. आता पुन्हा एकदा कमिन्सच्या संघानं भारताच्या स्वप्नांवर पाणी फेरलं.
(हेही वाचा: WC 2023 Final : संजय मांजरेकरांमुळे भारत हरला? युझर्सची टीका, अहमदाबादच्या प्रेक्षकांवरही राग अनावर )