घरक्रीडाDenmark Open : लक्ष्य सेनची विजयी सलामी

Denmark Open : लक्ष्य सेनची विजयी सलामी

Subscribe

डेन्मार्क ओपन ही कोरोनानंतरची पहिलीच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे.

भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने डेन्मार्क ओपन स्पर्धेची विजयी सुरुवात केली. त्याने पहिल्या फेरीच्या सामन्यात क्रिस्टो पोपोव्हचा सरळ गेममध्ये पराभव केला. कोरोनामुळे जगातील सर्व खेळ बंद होते आणि याला बॅडमिंटनही अपवाद नव्हता. मात्र, आता सात महिन्यांनंतर बॅडमिंटन स्पर्धांना पुन्हा सुरुवात झाली असून डेन्मार्क ओपन ही कोरोनानंतरची पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ‘सात महिन्यांनंतर पुन्हा एकदा बॅडमिंटन खेळायला मिळत असल्याचा आनंद आहे. बॅडमिंटन कोर्टवर उतरल्यावर सगळे पूर्ववत झाल्यासारखे वाटले,’ असे लक्ष्य म्हणाला.

चुका टाळण्यात यश आले

लक्ष्य सेनला बॅडमिंटन कोर्टवर विजयी पुनरागमन करण्यात यश आले. १९ वर्षीय लक्ष्यने पहिल्या फेरीत पोपोव्हचा २१-९, २१-१५ असा सरळ गेममध्ये पराभव केला. मागील वर्षी पाच स्पर्धा जिंकणारा लक्ष्य डेन्मार्क ओपनच्या पहिल्या फेरीत चांगला खेळ करताना दिसला. पहिला गेम त्याने सहजपणे जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र पोपोव्हने त्याला झुंज दिली. या गेममध्ये १२-१२ अशी बरोबरी होती. यानंतर मात्र लक्ष्यने त्याचा खेळ उंचावत हा गेम आणि सामना जिंकला. ‘मी चांगल्या हालचाली करू शकलो. दुसऱ्या गेममध्ये माझ्याकडे आघाडी होती, पण नंतर मी काही चुका केल्या. मात्र, अखेरचे काही गुण मिळवताना मला त्या चुका टाळण्यात यश आले. त्यामुळेच मी विजय मिळवू शकलो’, असे सामन्यानंतर लक्ष्यने सांगितले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -