लार्सन टूर्बोने पटकावले ठाणेवैभव करंडक आंतरकार्यालयीन टी – २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद

लार्सन टूर्बोने टाईम्स ऑफ इंडिया संघाचा १९ धावांनी पराभव करत ४६ व्या ठाणेवैभव करंडक आंतरकार्यालयीन टी - २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. सेंट्रल मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत लार्सन टूर्बो संघाने प्रथम फलंदाजी करत १९.५ षटकात १४८ धावांचे आव्हान प्रतिस्पर्ध्यासमोर उभे केले.

लार्सन टूर्बोने टाईम्स ऑफ इंडिया संघाचा १९ धावांनी पराभव करत ४६ व्या ठाणेवैभव करंडक आंतरकार्यालयीन टी – २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. सेंट्रल मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत लार्सन टूर्बो संघाने प्रथम फलंदाजी करत १९.५ षटकात १४८ धावांचे आव्हान प्रतिस्पर्ध्यासमोर उभे केले. शिवा यादवने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी करताना आठ चौकारानीशी ४७ चेंडूत ५५ धावा करत संघाच्या एकूण धावसंख्येत मोलाचे योगदान दिले.

राहुल जोशीने २७ धावा केल्या. पंकज सावंतने गोलंदाजीत छाप पाडताना ४ षटकात एका निर्धाव षटकासह १८ धावांत ३ फलंदाज बाद केले. हरिकेश नरे आणि अनिर्बन चौधरीने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. अंकित गांधी, परितोष मोहिते, सत्यजित बॅनर्जीने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रथमेश आणि परितोष मोहितेने दमदार फलंदाजी करत संघाला विजयाची आस दाखवली. गोलंदाजीप्रमाणे फलदाजीतही आपली उपयुक्तता सिद्ध करताना हरिकेशने नाबाद २४ धावा केल्या. प्रथमेशने ३१ आणि परितोषने ४० धावा केल्या. या तिघांचा अपवाद वगळता इतर फलंदाज धावा उभारण्यात अपयशी ठरल्याने टाईम्स ऑफ इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. सुशांत शेट्टी आणि जतिन सेठीने मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवत संघाला विजयाच्या नजीक नेले. सिद्धेश चव्हाण, जगदीश सोरखडे आणि सचिन आहुजाने प्रत्येकी एक विकेट मिळवली.


हेही वाचा – ‘चेन्नई’चा सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या ‘या’ विक्रमाने सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे