घरक्रीडाशेवटचे षटक टाकणे सोपे नाही !

शेवटचे षटक टाकणे सोपे नाही !

Subscribe

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-२० सामना गमावला. या सामन्यात भारताने दिलेल्या १२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला अखेरच्या षटकात १४ धावांची गरज होती. उमेश यादव टाकत असलेल्या या षटकात पॅट कमिन्स आणि जाय रिचर्डसन यांनी अप्रतिम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. उमेश तळाच्या फलंदाजांसमोर १४ धावांचा बचाव करू शकला नाही म्हणून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. मात्र, जसप्रीत बुमराह त्याच्या बचावासाठी धावून आला आहे. कोणत्याही स्थितीत शेवटचे षटक टाकणे सोपे नसते, असे बुमराह म्हणाला.

स्थिती कोणतीही असली तरी शेवटचे षटक टाकणे कोणत्याही गोलंदासाठी सोपे नसते. कधी तुम्ही चांगली गोलंदाजी करता आणि कधी तसे होत नाही. त्यातही अटीतटीच्या क्षणी चेंडूगणिक परिस्थिती बदलत असते. त्यावेळी प्रत्येक गोलंदाज आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. मात्र, कधीकधी निकाल तुमच्या बाजूने लागत नाही. आम्हाला हा सामना जिंकायचा होता. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे आता त्याबाबत विचार करत न बसता पुढे जायला हवे, असे बुमराहने सामन्यानंतर सांगितले.

- Advertisement -

तसेच सर्व फलंदाजांनी थोडे अजून जबाबदारीने खेळण्याची गरज होती, असेही बुमराह म्हणाला. आम्ही १५-२० धावा कमी केल्या. सर्वांनीच थोडे जबाबदारीने खेळायला हवे होते. पण, क्रिकेटमध्ये असे होऊ शकते. आम्ही २-३ विकेट जास्तच गमावल्या, असे बुमराहने नमूद केले. बुमराहने या सामन्यात ४ षटकांत १६ धावा देत ३ विकेट घेतल्या. त्याने १९व्या षटकात अवघ्या दोन धावा दिल्यामुळेच भारताला हा सामना जिंकण्याची संधी निर्माण झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -