घरक्रीडाLata Mangeshkar Birthday : म्हणूनच लता दीदींसाठी प्रत्येक मॅचसाठी सीट असते आरक्षित

Lata Mangeshkar Birthday : म्हणूनच लता दीदींसाठी प्रत्येक मॅचसाठी सीट असते आरक्षित

Subscribe

गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज आपला ९२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. इंदोरमध्ये २८ सप्टेंबर १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला होता. लता दीदींच्या क्रिकेट प्रेमाशी संबंधित अनेक किस्से आहेत. त्यापैकी एक विश्वचषकाशी संबंधित असाही आहे. लता मंगेशकर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI) यांच्यात आगळे वेगळे असे नाते आहे. त्यामुळेच आजही बीसीसीआयकडून लता मंगेशकर यांना मान दिला जातो. एकेकाळी अतिशय संकटात असणाऱ्या बीसीसीआयला एनवेळी केलेल्या मदतीसाठीचा सन्मान म्हणूनच बीसीसीआयकडून त्यांना आजही एक वेगळीच ट्रिटमेंट दिली जाते. बीसीसीआयच्या अतिशय कठीण काळातही लता मंगेशकर यांनी पुढे केलेला मदतीचा हात आजही बीसीसीआयने विसरला नाही. म्हणूनच लता मंगेशकर यांना बीसीसीआयकडून प्रत्येक सामन्यासाठी एक जागा आरक्षित असते. (Lata mangeshkar helped bcci in tough time, bcci always keeps seat vacant as respect)

भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वात १९८३ साली विश्वचषक स्पर्धेते जेतेपद मिळवला होता. या स्पर्धेच्या वेळी बीसीसीआयची आर्थिक अवस्था अतिशय नाजूक होती. बीसीसीआयची अवस्था इतकी नाजूक होती की, बीसीसीआयला भारतीय खेळाडूंना विश्वचषक जिंकल्यानंतर साधी बक्षीसाची रक्कम देण्यासाठीही पैसा नव्हता. त्यातून कहर म्हणजे विश्वविजेत्या संघाला डिनर पार्टी देण्यासाठीही बीसीसीआयकडे पैसे नव्हते. विश्वचषक जिंकला होता तेव्हा एनकेपी साळवे हे बीसीसीआय अध्यक्षस्थानी होते.

- Advertisement -

बीसीसीआयची नाजूक अवस्था पाहता राजसिंह डुंगरपुरकर यांनी खेळाडूंना बक्षीसाच्या रकमेसाठी लता मंगेशकर यांना चॅरिटी शो करायची विनंती करण्याचा प्रस्ताव ठेवला. क्रिकेट फॅन असल्यानेच लता मंगेशकर यांनीही हा प्रस्ताव तत्काळ स्विकारला. त्यामुळे डुंगरपुरकर यांनी क्लुप्ती त्यावेळी कामी पडली. त्यानंतर १७ ऑगस्ट १९८३ रोजी दिल्लीच्या इंदप्रस्थ स्टेडिअममध्ये लता मंगेशकर यांचा शो पार पडला. या कार्यक्रमाला चाहत्यांनी एकच गर्दी केली. कार्यक्रम अतिशय यशस्वी ठरला. या कार्यक्रमानंतर बीसीसीआयला खूप पैसे मिळाले. पण या कार्यक्रमासाठी लता मंगेशकर यांनी एकही रूपयाचे मानधन स्विकारले नाही. अतिशय कठीण प्रसंगी मदत केल्यानेच लता मंगेशकर यांचे बीसीसीआयने आभार मानले.


हेही वाचा – शरद पवार CM असताना १० मिनिटात लतादीदींचे मोठं स्वप्न पुर्ण केलयं

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -