घरक्रीडामेस्सीने मोडला पेलेचा विक्रम; एका फुटबॉल क्लबसाठी सर्वाधिक गोल 

मेस्सीने मोडला पेलेचा विक्रम; एका फुटबॉल क्लबसाठी सर्वाधिक गोल 

Subscribe

एका क्लबसाठी सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आता मेस्सीच्या नावे झाला.

बार्सिलोनाने ला लिगाच्या सामन्यात रियाल वॅलादालिद संघाचा ३-० असा पराभव केला. या सामन्यादरम्यान बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. मेस्सीने या सामन्यात ६५ व्या मिनिटाला बार्सिलोनाचा तिसरा गोल केला. हा मेस्सीचा बार्सिलोनासाठी ६४४ वा गोल ठरला. त्यामुळे एका फुटबॉल क्लबसाठी सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आता मेस्सीच्या नावे झाला असून त्याने ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांना मागे टाकले.

पेले यांनी ब्राझीलमधील फुटबॉल संघ सॅन्टोसकडून खेळताना ६४३ गोल केले होते. मात्र, मेस्सीने त्यांचा हा विक्रम मोडीत काढला. मेस्सीने बार्सिलोनाचे १७ वर्षे प्रतिनिधित्व करताना आतापर्यंत ७४९ सामन्यांत ६४४ गोल केले आहेत. वॅलादालिदविरुद्धच्या सामन्यात मेस्सीने उत्तरार्धात गोल केला. त्याआधी मेस्सीच्याच पासवर क्लेमेंट लेंगलेने गोल करत बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली होती. मेस्सी आणिलेंगलेप्रमाणेच मार्टिन ब्रेथवेटने केलेल्या गोलमुळे बार्सिलोनाने हा सामना ३-० असा जिंकला.

- Advertisement -

विक्रम मोडण्याचा विचारही केला नव्हता

पेले यांचा विक्रम मोडल्यानंतर मेस्सीने सोशल मीडियावरून सर्वांचे आभार मानले. ‘फुटबॉल खेळायला सुरुवात केली, तेव्हा मी कोणतेही विक्रम मोडण्याचा विचारही केला नव्हता. खासकरून पेले यांचा विक्रम मी मोडेन असे मला कधीही वाटले नव्हते. हा विक्रम मोडण्यासाठी मला ज्यांनी मदत केली, अशा माझ्या सहकाऱ्यांचे, माझ्या कुटुंबाचे, माझ्या मित्रांचे आणि सर्वांचेच मी आभार मानतो,’ असे मेस्सीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -