घरक्रीडाफुटबॉलसाठी दुःखाचा दिवस; मेस्सीने वाहिली मॅराडोना यांना आदरांजली

फुटबॉलसाठी दुःखाचा दिवस; मेस्सीने वाहिली मॅराडोना यांना आदरांजली

Subscribe

मॅराडोना यांना आजी-माजी फुटबॉलपटूंसह क्रीडा विश्वातील अनेक नामवंत खेळाडूंनी आदरांजली वाहिली.

‘फुटबॉलसाठी आज दुःखाचा दिवस आहे,’ असे म्हणत लिओनेल मेस्सीने दिएगो मॅराडोना यांना आदरांजली वाहिली. मेंदूच्या विकारातून दोन आठवड्यांपूर्वीच बरे झालेल्या मॅराडोना यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मॅराडोना यांना आजी-माजी फुटबॉलपटूंसह क्रीडा विश्वातील अनेक नामवंत खेळाडूंनी आदरांजली वाहिली. यात अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचाही समावेश होता. मॅराडोना हे फुटबॉल इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक मानले जातात, तर मेस्सी सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. मेस्सी हा मॅराडोना यांचा वारसा पुढे चालवत असल्याचेही अनेकदा म्हटले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Leo Messi (@leomessi)

मेस्सीने मॅराडोना यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत सोशल मीडियावरून त्यांना आदरांजली वाहिली. ‘अर्जेंटिनाच्या सर्व लोकांसाठी आणि फुटबॉलसाठी आज दुःखाचा दिवस आहे. दिएगो यांचे निधन झाले असले तरी ते फार दूर गेलेले नाहीत, कारण दिएगो अमर आहेत,’ असे मेस्सीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले. मेस्सीप्रमाणेच पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तिआनो रोनाल्डोनेही मॅराडोना यांना आदरांजली वाहिली. ‘आज मी माझ्या मित्राला अलविदा करतो आणि हे जग एका जादूगाराला अलविदा करत आहे. ते सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक होते. ते आपल्याला खूप लवकर सोडून गेले. परंतु, त्यांना आपण कधीही विसरू शकणार नाही,’ असे रोनाल्डो म्हणाला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -