Wednesday, August 4, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा इंग्लंडच्या या खेळाडूने मारला सर्वात लांब सिक्स; व्हिडिओ होतोय व्हायरल

इंग्लंडच्या या खेळाडूने मारला सर्वात लांब सिक्स; व्हिडिओ होतोय व्हायरल

Related Story

- Advertisement -

इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये टी-२० मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकांत २०० धावा केल्या. यजमान संघाकडून कर्णधार जोस बटलरने ५९ आणि लियम लिव्हिंगस्टोनने ३९ धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने त्याच्या खेळीदरम्यान एक षटकार ठोकला ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

लिव्हिंगस्टोनने १६ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हरीस रऊफला षटकार लगावला. षटकार एवढ्या जोरात ठाकला की चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला. हा सिक्स १२२ मीटर लांबीचा होता. लिव्हिंगस्टोनच्या सिक्सने प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला.

- Advertisement -

- Advertisement -

दरम्यान, पहिल्या टी -२० मध्ये पाकिस्तानने यजमानांना धूळ चारली आहे. त्यामुळे मालिकेत पुनरागमन करण्याच्या तयारीने इंग्लंडचा संघ मैदानात उतरला होता. या सामन्यात इंग्लंडची सुरुवात चांगली नाही झाली. इमाद वसीमने जेसन रॉय आणि डेव्हिड मालनला लवकर पॅव्हेलियनवर पाठवले, पण यानंतर बटलरला साथ देण्यासाठी आलेल्या मोईन अलीने (३६) फटकाने संघाला सावरलं. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त लिव्हिंगस्टोनने २३ चेंडूत तीन षटकार आणि दोन चौकार लगावत संघाला मोठ्या धावसंख्येवर नेले.

 

- Advertisement -