घरक्रीडाधोनीसारखाच ‘हा’ खेळाडू रेल्वेत नोकरीला, आयपीएलमध्ये येताच बनला करोडपती

धोनीसारखाच ‘हा’ खेळाडू रेल्वेत नोकरीला, आयपीएलमध्ये येताच बनला करोडपती

Subscribe

मुंबई : जगभरात नावालौकीस आलेल्या आयपीएलमध्ये युवा खेळाडू आपले कौशल्य दाखवतात आणि जगाला आपली ओळख करून देतात. आयपीएलमुळे अनेक खेळाडूंचे भाग्य उजळले असून अनेक खेळाडू लिलावात करोडपती बनले आहेत. आयपीएलमधील असाच एक खेळाडू आहे जो भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसारखाच रेल्वेव नोकरी करत होता आणि आता आयपीएलचा भाग आहे.

हेही वाचा – रोहित शर्माच्या १०००० धावा पूर्ण, सचिन-धोनीच्या स्पेशल क्लबमध्ये प्रवेश

- Advertisement -

रॉयल चॅलेंजर बॅगळुरू संघाने 2022 मध्ये आयपीएल लिलावात फिरकी गोलंदाज कर्ण शर्माला संघात खेळण्याची संधी दिली आणि त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अनेक फलंदाजांना अडकवले. या कर्ण शर्माच्या जीवनाबद्दल त्याला ओळखत असलेल्या लोकांना माहिती आहे. कर्ण शर्मा हा धोनीप्रमाणेच रेल्वेत नोकरी करत होता. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. परंतु कौंटुबिक परिस्थितीमुळे त्याने २००५ मध्ये रेल्वेत फोर्थ ग्रेडची नोकरी स्विकारली. कर्ण रेल्वे रुळाची दुरुस्ती करणे आणि लोखंडी रॉड उचलण्याचे काम करत होता. परंतु, २०१४ मध्ये त्याचे नशीब उजळले. आयपीएल ७ व्या हंगामात हैद्राबाद संघाने त्याला तब्बल ३.७५ कोटी रुपयांत खरेदी केले. त्यामुळे रेल्वेत फोर्थ ग्रेडची नोकरी करणारा कर्ण शर्मा करोडपती झाला.

कर्ण शर्माच्या करिअरविषयी
कर्ण शर्माने २००७ मध्ये रेल्वे रणजी संघातून क्रिकेटच्या करिअरला सुरुवात केली. त्याने सप्टेंबर २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळला आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय करिअरला सुरवात झाली. त्याचवर्षी डिसेंबरमध्ये कर्ण शर्माला श्रीलंकाविरुद्ध एकदिवसीय आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. कर्ण शर्माने भारतासाठी एकूण चार सामने खेळताना पाच विकेट्स घेतल्या आहेत. तसेच कर्ण शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत ६८ सामने खेळताना ७.९१ च्या इकोनॉमी रेटने ५९ विकेट घेतल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यात विराटने केला ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -