मेस्सीने जिंकला पाचवा गोल्डन शू

L messi
लिओनल मेस्सी

बार्सिलोनाचा स्टार खेळाडू मेस्सी हा २०१७-१८ चा युरोपियन गोल्डन शूचा मानकरी ठरला आहे. ला-लिगामध्ये बार्सिलोनाकडून ३४ गोल करत मेस्सीने हा पुरस्कार पटकावला. त्याने पाच वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. तर रोनाल्डो याने हा पुरस्कार चार वेळच जिंकला असल्याने मेस्सी या रेसमध्ये रोनाल्डोच्या पुढे पोहोचला. सिरो इमोबिलो आणि इकार्डी हे या टॉप गोलच्या रेसमध्ये होते. त्यांनी २९ गोलपर्यंतच मजल मारली आणि मेस्सी बिनविरोध ही रेस जिंकत गोल्डन शूचा मानकरी ठरला.
यापूर्वी २००९-१०, २०११-१२, २०१२-१३ आणि २०१६-१७ मध्ये देखील मेस्सीने हा शू जिंकला होता. तसेच मेस्सीचा नेहमीचा प्रतिस्पर्धी रोनाल्डो ह्याने चार वेळा हा शू जिंकला. जगातल्या टॉप प्लेअर्समध्ये मोजला जाणारा मेस्सी हा सध्याचा नंबर १ चा खेळाडू आहे. मेस्सीने आपल्या करिअरची सुरुवातच बार्सिलोनाकडून केली. २००३ आणि २००४ मध्ये प्रॅक्टिस करून अखेर २००५ मध्ये आपल्या १८व्या वाढदिवशी मेस्सीने वरिष्ठ प्लेअर म्हणून कॉन्ट्रॅक्ट साइन केले. बऱ्याच खेळाडूंनी आपल्या चांगल्या फॉर्मंनंतर आपली टीम बदलली. यात रोनाल्डो, नेयमार यांचा समावेश होतो. मात्र, मेस्सी इतक्या चांगल्या फॉर्मनंतर देखील आजही बार्सिलोनाकडून खेळत आहे. त्यामुळे मेस्सीच्या चाहत्यांत दिवंसेदिवस वाढ होत आहे. मेस्सी आपल्या उत्कृष्ट खेळाने नेहमीच सर्वांचे मनोरंजन करतो. अनेक रेकॉर्डस् मेस्सीच्या नावावर असून, त्यात दिवसेंदिवस भर पडताना दिसते. अनेक पुरस्कारांचा मानकरी असलेला मेस्सीच्या खात्यात आणखीन एक मानाचा पुरस्कार अर्थात हा गोल्डन शू समाविष्ट झाला आहे.