Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा FIFA WC22: मेस्सीची आक्रमक खेळी; क्रोएशियाचा पराभव करत अर्जेंटिनाची अंतिम फेरीत धडक

FIFA WC22: मेस्सीची आक्रमक खेळी; क्रोएशियाचा पराभव करत अर्जेंटिनाची अंतिम फेरीत धडक

Subscribe

लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत मंगळवारी रात्री उशिरा अर्जेंटिनाने क्रोएशियाचा ३-० असा पराभव केला. या विजयासह अर्जेंटिनाच्या संघाने ८ वर्षांनंतर अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.

लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत मंगळवारी रात्री उशिरा अर्जेंटिनाने क्रोएशियाचा ३-० असा पराभव केला. या विजयासह अर्जेंटिनाच्या संघाने ८ वर्षांनंतर अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. विश्वचषकाच्या इतिहासात अर्जेंटिना सहाव्यांदा अंतिम फेरीत खेळणार आहे. (Lionel Messi Argentina Beat Croatia 3 0 To Enter Final Fifa World Cup 2022 Football)

फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा सामना फ्रान्स किंवा मोरोक्कोशी होणार आहे. जो संघ दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात विजेता असेल. फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता खेळवला जाणार आहे. लिओनेल मेस्सीचा विश्वचषकातील हा २६वा सामना असणार आहे. या सामन्याच्या आगमनाने, तो विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक कॅप खेळणारा खेळाडू बनणार आहे.

- Advertisement -

मेस्सीचे ड्रीबलिंग आणि अल्वारेझचे फिनिशिंग या चमत्काराच्या जोरावर अर्जेंटिनाने विश्वकरंडक फुटबॉलच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या अर्जेंटिना संघाने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळी केली.

मेस्सीने आघाडीवर रहात आपल्या ड्रीबलिंगद्वारे क्रोएशियाच्या गोलजाळ्याच्या दिशेने धडका देण्यास सुरुवात केली. हा दबाव क्रोएशियाला सहन होत नव्हता आणि त्यातूनच गोलरक्षक लिव्हाकोविक याने गोल जाळ्याच्या दिशेने चेंडूसह निघालेल्या अर्जेंटिनाच्या अल्वारेझला पेनल्टी एरियात चुकीच्या पद्धतीने रोखले. पंचांनी तत्काळ अर्जेंटिनाला पेनल्टी बहाल केली. ही संधी मेस्सीने साधली आणि ३३ व्या मिनिटाला अर्जेंटिनाने १-० अशी भक्कम आघाडी घेतली.

- Advertisement -

मेस्सीचा विश्वकरंडकातील हा अकरावा गोल होता. त्याने या स्पर्धेत दिएगो मॅरेडोना आणि बॅटिस्टुटा यांचा दहा गोलांचा विक्रम देशाकडून खेळताना मागे टाकला आहे.

३५ वर्षीय मेस्सीचा हा शेवटचा विश्वचषक असू शकतो. अशा परिस्थितीत अर्जेंटिनाच्या संघाला यावेळी चॅम्पियन बनवण्यासाठी तो त्याच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकद लावत आहे. यावेळी अर्जेंटिनाला तिसरे विजेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. हा संघ विजेतेपदापासून फक्त एक विजय दूर आहे. अर्जेंटिनाने आतापर्यंत 1978 आणि 1986 मध्ये दोनदा विजेतेपद पटकावले होते.

या सामन्यातील दोन्ही संघ

अर्जेंटिनाचा संघ: एमिलियानो मार्टिनेझ (गोलकीपर), लिओनेल मेस्सी (कर्णधार), ज्युलियन अल्वारेझ, अॅलेक्सिस मॅकअॅलिस्टर, लिएंड्रो परेडिस, एन्झो फर्नांडीझ, रॉड्रिगो डी पॉल, निकोलस टॅगलियाफिको, निकोलस ओटामेंडी, क्रिस्टियन रोमेरो आणि नहुएल मोलिना.

क्रोएशिया संघ: डॉमिनिक लिव्हकोविक (गोलकीपर), इव्हान पेरिसिक, आंद्रेज क्रॅमरिक, मारियो पासालिक, लुका मॉड्रिक (कर्णधार), माटेओ कोव्हासिक, मार्सेलो ब्रोझोविक, जोसिप जुरानोविक, जोस्को गार्डिओल, बोर्ना सोसा आणि डेजान लोवरेन.


हेही वाचा – भारतीय संघात नसलेले दोन खेळाडू आयपीएलच्या लिलावात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -