घरक्रीडाफिफा वर्ल्डकप : लिओनेल मेस्सीने मोडला डिएगो मॅराडोनाचा गोलविक्रम, रोनाल्डोशी केली बरोबरी

फिफा वर्ल्डकप : लिओनेल मेस्सीने मोडला डिएगो मॅराडोनाचा गोलविक्रम, रोनाल्डोशी केली बरोबरी

Subscribe

अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने सर्वाधिक गोल करत इतिहास रचला आहे. कतार विश्वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात मेस्सीने 10व्या मिनिटाला सौदी अरेबियाविरुद्ध गोल केला. त्याने पेनल्टी असतानाही गोल करत टीमचे खाते उघडले. मात्र, मेस्सीच्या या गोलनंतरही अर्जेंटिनाचा विजय झाला नाही. अर्जेंटिना टीमचा सौदी अरेबियाने 2-1 ने पराभव केला. तसेच सौदी अरेबियाकडून सालेह अलसेहरीने 48व्या मिनिटाला आणि सालेम अल्दवसारीने 53व्या मिनिटाला गोल केले.

या पराभवासह अर्जेंटिनाची सलग 36 सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली. अर्जेंटिना आता 27 नोव्हेंबरला मेक्सिको आणि 30 नोव्हेंबरला पोलंडशी भिडणार आहे. सौदी अरेबियाचा हा केवळ तिसरा विजय ठरला आहे. अर्जेंटिनाला आता प्री-क्वार्टर फायनलसाठी आपले उर्वरित दोन सामने जिंकावे लागणार आहेत. या सामन्यातील पराभवानंतरही मेस्सीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. यासह पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोचीही बरोबरी केली आहे.

- Advertisement -

चार वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये गोल करणारा मेस्सी अर्जेंटिनाचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचा हा पाचवा विश्वचषक आहे. त्याने 2006, 2014, 2018 आणि 2022 मध्ये गोल केले आहेत. 2010 मध्ये मेस्सीला एकही गोल करता आला नव्हता. या बाबतीत मेस्सीने संघाचा माजी कर्णधार डिएगो मॅराडोना आणि बतिस्तुताला मागे सोडले आहे.

दिवंगत डिएगो मॅराडोनाने 1982, 1986 आणि 1994 च्या विश्वचषकात गोल केले होते. त्याच वेळी, बतिस्तुताने 1994, 1998 आणि 2002 च्या विश्वचषकात गोल केले. चार वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये गोल करणारा मेस्सी हा फुटबॉल इतिहासातील पाचवा खेळाडू आहे. या बाबतीत मेस्सीने ब्राझीलचा पेले, जर्मनीचा उवे सीलर, मिरोस्लाव क्लोस आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची बरोबरी केली आहे. एवढेच नाही तर मेस्सीने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या आणखी एका विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याने विश्वचषकातील सातवा गोल केला. रोनाल्डोचेही तेवढेच गोल झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : फिफा वर्ल्ड कपमधील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट खेळाडू, जाणून घ्या कोणाला मिळालेत सर्वाधिक गोल्डन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -