घरक्रीडालोकेश राहुलला धावांची गरज - संजय बांगर   

लोकेश राहुलला धावांची गरज – संजय बांगर   

Subscribe

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यामते जर राहुलला संघातील स्थान कायम ठेवायचे असेल तर त्याला धावांची गरज आहे.  

भारताचा सलामीवीर लोकेश राहुल क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनविरुद्ध सराव सामन्याच्या पहिल्या डावात अवघ्या ३ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याचे संघातील स्थान अजून अनिश्चित आहे. त्यामुळे भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यामते जर राहुलला संघातील स्थान कायम ठेवायचे असेल तर त्याला धावांची गरज आहे.

राहुल आता युवा खेळाडू नाही 

 बांगर राहुलविषयी म्हणाले, “राहुलकडे खूप क्षमता आहे. पण त्याच्या कामगिरीत सातत्य नाही. तो आता युवा खेळाडू नाही. तो त्याच्या दुसऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. त्याने आता जवळपास ३० कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे त्याला संघात राहायचे असेल तर धावा करणे गरजचे आहे.”

आउट होण्याचे नवे मार्ग शोधत आहे 

सराव सामन्यातील राहुलच्या खराब फलंदाजीविषयी बांगर म्हणाले, “राहुल आज चांगल्या लयीत होता. मात्र तो मागील काही काळात तो बाद होण्यासाठी नवे मार्ग शोधत आहे. आजसुद्धा शरीरापासून लांब असलेला चेंडू त्याने मारला. ज्याची त्याला गरज नव्हती.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -