घरक्रीडाIND vs AUS : भारताच्या 'या' आक्रमक फलंदाजाला गोलंदाजी करण्यास उत्सुक -...

IND vs AUS : भारताच्या ‘या’ आक्रमक फलंदाजाला गोलंदाजी करण्यास उत्सुक – लायन 

Subscribe

लायनने ब्रिस्बन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माला बाद केले.

रिषभ पंत माझ्याविरुद्ध नेहमीच आक्रमक शैलीत फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ब्रिस्बन कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करण्यास मी उत्सुक आहे, असे विधान ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नेथन लायनने केले. लायनचा कसोटी कारकिर्दीतील हा १०० वा सामना असून त्याने या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माला बाद केले. रोहितने ड्राईव्ह आणि कटचे चांगले फटके मारत ७४ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. मात्र, त्याला लायनने माघारी पाठवले. लायनची ही कसोटीतील ३९७ वी विकेट ठरली. उर्वरित सामन्यात तो पंतविरुद्ध गोलंदाजी करण्याची वाट पाहत आहे.

रोहित फारच उत्कृष्ट फलंदाज आहे. त्यामुळे मी त्याला सर्वोत्तम चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत होतो. या खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळत असून याचा फायदा घेण्याचा माझा प्रयत्न आहे. मी खासकरून पंतविरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहे. मी गोलंदाजी करत असताना तो नेहमीच आक्रमक शैलीत खेळून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना मजा येते, असे लायनने सांगितले. सिडनी येथे झालेल्या मागील कसोटीत पंतने ११८ चेंडूत ९७ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने लायनच्या गोलंदाजीवर तीन षटकार मारले होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -