घरक्रीडाभारताचे गोलंदाज स्मिथविरुद्ध कशी गोलंदाजी करतात हे पाहण्यास उत्सुक!

भारताचे गोलंदाज स्मिथविरुद्ध कशी गोलंदाजी करतात हे पाहण्यास उत्सुक!

Subscribe

मायकल अ‍ॅथर्टन यांचे उद्गार

विराट कोहलीचा भारतीय संघ यावर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर जाणार असून या दोन बलाढ्य संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. मागील वर्षी भारताने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर खेळू शकले नव्हते. यंदा मात्र त्यांचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश असेल. त्यामुळे भारताला यंदा मागील वर्षीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करायची असल्यास त्यांना स्मिथला लवकर माघारी पाठवावे लागेल, असे इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल अ‍ॅथर्टन यांना वाटते.

भारताकडे खूपच चांगले गोलंदाज आहेत. ते स्मिथविरुद्ध कशी गोलंदाजी करतात आणि त्याला अडचणीत टाकण्यासाठी ते काय योजना आखतात, हे पाहण्यास मी उत्सुक आहे. स्मिथची खेळण्याची शैली जरा वेगळी आहे. मात्र, याच कारणामुळे मला त्याची फलंदाजी पाहायला फार आवडते. वेगळ्या पद्धतीने आणि तंत्राने खेळणारे खेळाडू असणे हे खेळाच्या हिताचे असते. प्रत्येक जण सारखाच खेळत असल्यास खेळाची मजा निघून जाईल. स्मिथसारख्या खेळाडूंमुळे खेळाची उत्सुकता कायम राहते. त्याची फलंदाजीची शैली वेगळी असली तरी त्याला बाद करणे सोपे नाही, असे अ‍ॅथर्टन यांनी सांगितले.

- Advertisement -

तसेच भारताच्या वेगवान गोलंदाजांचे कौतुक करताना अ‍ॅथर्टन म्हणाले की, भारताची वेगवान गोलंदाजांची फळी फारच मजबूत आहे. त्यामुळे यंदा पुन्हा ऑस्ट्रेलियात जिंकण्याची भारतीय चाहते आशा करू शकतात. मागील काही वर्षांत भारतीय क्रिकेटमध्ये बदल झाला आहे. त्यांच्याकडे आता बरेच चांगले वेगवान गोलंदाज घडत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -