घरक्रीडावर्ल्डकप जिंकण्यास उत्सुक!

वर्ल्डकप जिंकण्यास उत्सुक!

Subscribe

 प्रशिक्षक शास्त्रींचे उद्गार

भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वात आणि प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत दमदार कामगिरी केली आहे. भारताचा संघ कसोटी क्रमवारीत अव्वल, तर एकदिवसीय क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर आहे. मात्र, भारताच्या संघाला आयसीसीची जागतिक स्पर्धा जिंकता आलेली नाही. शास्त्री प्रशिक्षक झाल्यापासून भारताने २०१५ एकदिवसीय विश्वचषक, २०१६ टी-२० विश्वचषक आणि २०१९ एकदिवसीय विश्वचषक या तीन जागतिक स्पर्धा खेळल्या. या तिन्ही स्पर्धांमध्ये भारताला उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आला नाही. मात्र, शास्त्रींना प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपण्याआधी जागतिक स्पर्धा जिंकण्याच्या आणखी दोन (२०२० आणि २०२१ टी-२० विश्वचषक) संधी मिळणार आहेत. या दोन स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत विश्वविजेते बनण्यास ते उत्सुक आहेत.

मला जिंकायला आवडते. १९८३ विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचा मी भाग होतो. त्यानंतर १९८५ साली जागतिक स्पर्धा जिंकलेल्या भारतीय संघातही माझा समावेश होता. मी आता भारतीय संघाचा प्रशिक्षक असून हा संघ मागील तीन वर्षे जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे आगामी काळात आयसीसीची एकतरी जागतिक स्पर्धा जिंकण्यास मी उत्सुक आहे. आमचा हा संघ, भारतीय आणि जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम संघांपैकी एक म्हणून ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असे शास्त्रींनी एका मुलाखतीत सांगितले.

- Advertisement -

जागतिक स्पर्धा जिंकण्याबाबत काही दिवसांपूर्वी कर्णधार कोहलीने मात्र काहीसे वेगळे विधान केले होते.आपल्या संघाने आयसीसीची स्पर्धा जिंकावी ही लोकांची इच्छा असते. ही इच्छा खूप छान आहे. मात्र, तुम्ही जिंकण्याचा, आकड्यांचा, निकालांचा फार विचार केलात, तर तुम्हाला खेळाचा आनंद घेता येत नाही, असे कोहली म्हणाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -