घरक्रीडाअंतिम संघ निवडीमुळे भारत पराभूत - विराट कोहली

अंतिम संघ निवडीमुळे भारत पराभूत – विराट कोहली

Subscribe

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा दारूण पराभव झाला असून याचे मुख्य कारण ही अंतिम संघ निवडण्यात झालेली चूक असल्याची कबूली भारताचा कर्णधार विराटने दिली आहे.

भारताचा सध्या इंग्लंड दौरा सुरू असून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ टेस्ट मॅचची सिरीज खेळवली जात आहे. पहिल्या मॅचमध्ये ३१ धावांनी पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारताला काही खास कामगिरी करता आली नसून सामन्यात भारताला १ डाव आणि १५९ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवाचे मुख्य कारण ही अंतिम संघ निवडण्यात झालेली चूक असल्याची कबूली भारताचा कर्णधार विराट कोहली याने दिली असून यासंबधीत ट्विट आयसीसीने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून केले आहे.

- Advertisement -

आम्ही पराभूतच होणार होतो – विराट कोहली

भारतीय संघाचा सलग दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर कर्णधार विराटने पराभवाचे मुख्य कारण स्पष्ट केले आहे. सामन्यासाठीच्या अंतिम संघात खेळवणाऱ्या खेळाडूंची निवड करण्यात गफलत झाल्याने सामन्यात चांगले प्रदर्शन करता आले नाही असे विधान विराटने केले आहे. याबद्दल विराटने सांगितलेकी, “आम्ही ज्याप्रमाणे खेळलो मला अजिबात आवडले नाही, आम्ही ज्याप्रमाणे खेळलो त्यानुसार आम्ही हारणारच होतो.”

virat kohli
विराट कोहली

भारताचा १ डाव आणि १५९ धावांनी पराभव

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील दुसऱ्या टेस्ट मॅचमध्येही भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताला १ डाव आणि १५९ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले असून इंग्लंडने या दमदार विजयासह ५ टेस्ट मॅचेसच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. र्वात आधी भारताने बॅटिंग करत १०७ केल्या त्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी अप्रतिम बॅटिंग करत ७ बाद ३९६ धावांवर डाव घोषित केला. इंग्लंडकडून सर्वाधिक ख्रिस वोक्सने १३७, बेअरस्टोने ९३ धावा केल्या तर सॅम कुरनने ४० धावा करत भारतासमोर २४१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव अवघ्या १३० धावांत आटोपला आणि भारताला तब्बल १५९ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.

england team
इंग्लंडचा संघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -