घरक्रीडाIPL 2023 Opening Ceremony: रश्मिका-तमन्नाचा भन्नाट डान्स, अरिजीतच्या गाण्यांवर थिरकले धोनी-हार्दिक

IPL 2023 Opening Ceremony: रश्मिका-तमन्नाचा भन्नाट डान्स, अरिजीतच्या गाण्यांवर थिरकले धोनी-हार्दिक

Subscribe

आयपीएल २०२३च्या १६ व्या हंगामाला अखेर आजपासून सुरूवात झाली आहे. अनेक क्रिकेट प्रेमींचं याकडे लक्ष लागून होतं. अखेर आयपीएलच्या स्पर्धेला सुरूवात झाली असून दणक्यात उद्धाटन सोहळा पार पडला. यावेळी बॉलिवूड सिंगर अरिजीत सिंगने आपल्या मधूर आवाजात सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच त्याच्या गाण्यांवर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या हे दोघेही थिरकले.

- Advertisement -

एकीकडे दोन्ही संघाचे कर्णधार थिरकत असताना दुसरीकडे बॉलिवूड आणि दक्षिण अभिनेत्री तमन्ना भाटिया, रश्मिका मंदाना यांनीही डान्स केला. आयपीएलच्या उद्घाटन समारंभाची सुरुवात अरिजीत सिंगच्या धमाकेदार गाण्याने झाली. त्याने लेहरा दो, ब्रह्मास्त्रमधील ‘केसरिया तेरा इश्क है पिया’ चन्ना मेरे, कबीरा, अपना बना ले पिया, तुझे कितने चाहने लगे हम, झूम जो पठाण, शिवा आणि विविध प्रकारच्या गाण्याने त्याने सर्व चाहत्यांची मनं जिंकली.

मंदिरा बेदीने या आयपीएलच्या उद्घाटन समारंभाच्या अँकरिंगची जबाबदारी सांभाळली होती. बऱ्याच दिवसांनी ती आयपीएलमध्ये अँकरिंग करताना दिसली. तिला अँकरिंग करताना पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला.

- Advertisement -

आयपीएलचा उद्धाटन समारंभ पाड पडल्यानंतर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढतीला सुरूवात झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामन्याला संध्याकाळी ७.३० वाजता सुरूवात झाली. दोन्ही संघांमध्ये हा ब्लॉकबस्टर सामना होत आहे. यावेळी गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्ससमोर १७९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ९२ धावा केल्या. तर मोईन अलीने २३ धावांची खेळी केली. त्यानंतर धोनीने अखेरच्या षट्कात एक चौकार आणि एक षट्कार ठोकत संघाची धावसंख्या ७ बाद १७८ पर्यंत नेली. त्याने ७ चेंडूत १४ धावा केल्या. तसेच गुजरातकडून राशिद खान, अलझारी जोसेफ आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी जोशुआ लिटलला एक विकेट मिळाली.


हेही वाचा : आयपीएलमध्ये पाकच्या खेळाडूंना खेळवायचे नसेल तर.., माजी पंतप्रधानांची बीसीसीआयवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -