घरक्रीडालखनऊ आणि मुंबईच्या सामन्यात गफलत, एका संघाकडून खेळले १२ खेळाडू?

लखनऊ आणि मुंबईच्या सामन्यात गफलत, एका संघाकडून खेळले १२ खेळाडू?

Subscribe

लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काल (मंगळवार) अतितटीचा सामना पार पडला. मात्र, यावेळी लखनऊ या संघाने मुंबई इंडियन्सवर ५ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे लखनऊने या विजयासह प्लेऑफचा मार्ग आणखी सोपा केला आहे. तर मुंबईचा पराभव झाल्यामुळे साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर मुंबई संघाच्या प्लेऑफचं भवितव्य ठरणार आहे. परंतु या सामन्यात गफलत झाल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबई विरुद्धच्या सामन्यात लखनऊकडून ११ नाही, तर १२ खेळाडू खेळत असल्याचे म्हटलं जात आहे. तसेच तो खेळाडू सर्वांसमोर खेळत होता. मात्र, अंपायर्सने त्याला रोखलं नाही. तो १२ वा खेळाडू दुसरा-तिसरा कुणी नसून लखनऊचा मेन्टॉर गौतम गंभीर होता. गौतम गंभीर डगआऊटमधून सामन्यातील दुसऱ्या डावात गोलंदाजांना इशाऱ्याने मार्गदर्शन करत होता. मध्येमध्ये तो खेळाडूंना पाणी द्यायला जाणाऱ्या खेळाडूंद्वारे काहीतरी मेसेज पोहोचवत होता.

- Advertisement -

लखनऊने २० ओव्हर्समध्ये ३ गडी बाद करत १७७ धावा केल्या आणि विजयासाठी १७८ धावांचं आव्हान दिलं. परंतु मुंबईचा संघ २० ओव्हर्समध्ये १७१ धावाच करू शकला. तर मुंबईने ५ गडी गमावले होते. परंतु या विजयासह लखनऊ सुपर जायंट्सनं प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. तसेच लखनऊला एका अंकांचा प्लेऑफमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. प्रत्येक सामन्यात टीममधील मेन्टॉर असंच काही खाणाखुणा करत असतात. पण मुंबईचा पराभव हा चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे.

असे होते दोन्ही प्लेइंग इलेव्हन संघ –

मुंबई इंडियन्स  –

- Advertisement -

रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मढवाल.

लखनऊ सुपर जायंट्स –

कृणाल पांड्या (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग आणि मोहसिन खान.


हेही वाचा : सौरव गांगुलीला ‘Z’ दर्जाची सुरक्षा, पश्चिम बंगालच्या सुरक्षा अधिकाऱ्यांची माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -