घरक्रीडाLSG vs PBKS : मुंबई-पुणे प्रवासात लखनौ सुपर जायंट्स संघाच्या CEOच्या गाडीचा...

LSG vs PBKS : मुंबई-पुणे प्रवासात लखनौ सुपर जायंट्स संघाच्या CEOच्या गाडीचा अपघात, गौतम गंभीरचा मॅनेजर जखमी

Subscribe

आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामात आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना आहे. हा सामना सध्या पुण्यात सुरु आहे. पंजाब किंग्सने टॉस जिंकला असून त्यांनी सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु धक्कादायक बाब म्हणजे मुंबई-पुणे वेवरील प्रवासात लखनौ सुपर जायंट्स संघाच्या CEOच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. तर गौतम गंभीर यांचा मॅनेजर जखमी झाला आहे.

लखनौ सुपर जायंट्सचा ताफा मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होता. परंतु याच दरम्यान लखनौ सुपर जायंट्सचे सीईओ रघू अय्यर यांच्या गाडीचा अपघात झाला. ते लखनौ सुपर जायंट्स बसच्या मागे होते आणि त्यांच्या गाडीत गौतम गंभीर यांचा मॅनेजर गौरव अरोरा आणि राचिता बेरी हे सुद्धा होते. या तिघांना किरकोळ जखम झाली असून सर्व सुरक्षित असल्याची माहिती लखनौ सुपर जायंट्सने ट्विट करत दिली आहे.

- Advertisement -

लखनौ ८ सामन्यांत ५ विजयांसह चौथ्या, तर पंजाब ४ विजयांसह ७व्या क्रमांकावर आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत दोन्ही संघ असले तरी लखनौचे पारडे जड आहे. या सामन्याच्या निमित्ताने मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल हे दोन बालपणीचे मित्र प्रथमच ऐकमेकांसमोर उभे राहिले आहेत.

- Advertisement -

लखनौचा संघ आज ९ गोलंदाजांसह मैदानावर उतरला आहे. लोकेश राहुल आणि क्विंटन डी कॉक वगळल्यास लखनौच्या संघातील मार्कस स्टॉयनिस, कृणाल पांड्या, दीपक हुडा, आयुष बदोनी, जेसन होल्डर, दुष्मंथा चमिरा, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान हे चांगल्या प्रकारे गोलंदाजी करु शकतात. सध्याची स्थिती पाहिली असता लखनौ सुपर जायंट्सच्या १०४ धावा झाल्या असून पंजाब किंग्सने ३ गडी बाद केले आहेत. तसेच सामन्यात १४ ओव्हर्स पूर्ण झाल्या आहेत.


हेही वाचा : Mega Block : ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नाही; जाणून घ्या सविस्तर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -