घरक्रीडावनडेमध्ये रचला धोनीनं इतिहास; ठरला पहिला भारतीय खेळाडू

वनडेमध्ये रचला धोनीनं इतिहास; ठरला पहिला भारतीय खेळाडू

Subscribe

भारताचा उत्कृष्ट फिनिशर आणि विकेटकीपर म्हणून ओळख असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीनं अजून एक नवा इतिहास आपल्या नावे केला आहे.

भारताची इंग्लंडविरुद्ध दुसरी वनडे मॅच शनिवारी लॉर्ड्सवर खेळवण्यात आली. भारताचा उत्कृष्ट फिनिशर आणि विकेटकीपर म्हणून ओळख असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीनं अजून एक नवा इतिहास आपल्या नावे केला आहे. या मॅचमध्ये इंग्लंडच्या बॅटिंगदरम्यान ३७ व्या ओव्हरमध्ये उमेश यादवच्या बॉलिंगवर धोनीनं जोस बटलरचा कॅच पकडून ३०० कॅच घेणारा पहिला भारतीय विकेटकीपरचा मान मिळवला आहे. आपल्या वनडे करिअरमध्ये धोनीनं विकेटकिपिंग करत असताना ३०० कॅच पकडले आहेत. तर, जगभरात ३०० कॅच घेणाऱ्यांच्या यादीत धोनीनं चौथा क्रमांक पटकावला आहे.

याआधी टी – २० मध्येही रचला धोनीनं इतिहास

याआधी झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील टी २० सिरीजमध्येदेखील तिसऱ्या मॅचमध्ये धोनीनं अजून एक इतिहास रचला होता. आतापर्यंत टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा इतिहास कोणत्याही विकेटकीपरनं रचलेला नाही. मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये सिद्धार्थ कौलच्या तिसऱ्या बॉलवर धोनीनं प्लँकेटचा पकडलेल्या कॅचमुळं टी २० आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये पाच कॅच घेणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.

- Advertisement -

धोनीपेक्षा तीन विकेटकीपर आहेत पुढे

धोनीपेक्षा तीन विकेटकीपर पुढे असून पहिला क्रमांक ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रस्टचा आहे. त्यानं ४१७ कॅच घेतले असून दुसरा क्रमांक दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचरचा आहे, ज्यानं ४०३ कॅच घेतले आहेत. तर श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा तिसरा क्रमांक लागत असून त्यानं एकूण ४०२ कॅच घेतले आहेत. दरम्यान हे तीनही खेळाडू निवृत्त झाले असून धोनी अजूनही वनडे खेळत आहे. धोनी पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपपर्यंत खेळत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता अजून कोणता नवा विक्रम धोनी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -