MS Dhoni : जबरा फॅन ! धोनीला पाहण्यासाठी तब्बल १४५० km चालला; माहीने दिले रिटर्न गिफ्ट

धोनीच्या एका चाहत्याने धोनीची एक झलक पाहण्यासाठी जो आटापिटा केला आहे त्याची खुद्द धोनीने नोंद घेतली आहे

भारतीय क्रिकेट संघाचा माजी आणि सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस.एस धोनीचा मोठा चाहता वर्ग आहे. अशाच धोनीच्या एका चाहत्याने धोनीची एक झलक पाहण्यासाठी जो आटापिटा केला आहे त्याची खुद्द धोनीने नोंद घेतली आहे. हरियाणामधील अजय गिल नावाच्या धोनीच्या चाहत्याने रांचीला पोहचून धोनीची झलक पाहता यावी यासाठी तब्बल १४५० किलोमीटर पायी प्रवास केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे रांचीच्या हिरोला बघण्यासाठी गीलने मागील तीन महिन्यात दोनवेळा पायी प्रवास केला आहे. शेवटच्या वेळी गिल रांचीला गेला होता तेव्हा त्याला १६ दिवस लागले होते तर यावेळी त्याने १८ दिवस चालून आपल्या हिरोची भेट घेतली आहे.

पहिल्यांदा जेव्हा गिल रांचीला गेला होता तेव्हा धोनी तिथे नसल्यामुळे त्याला त्याच्या हिरोची भेट न घेताच माघारी परतावे लागले होते. मात्र यावेळी गिलची आपल्या हिरोला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली. माहितीनुसार धोनी त्याच्या चाहत्याला फक्त भेटलाच नाही, तर त्याला फॉर्म हाउसवरून देखील बोलवले. धोनीने त्याला ऑटोग्राफ देऊन फॉर्म हाउसमध्येच थांबण्याची व्यवस्था केली. सध्या आयपीएलमध्ये सीएसकेचा कर्णधार असलेल्या एम.एस धोनीने त्याचा चाहता सुरक्षित हरियाणाला पोहचण्यासाठी विमानाच्या तिकिटाचीही व्यवस्था करून दिली.

हरियाणातील जालन खेडा येथील १८ वर्षीय अजय गिल हा धोनीचा जबरा फॅन म्हणून प्रसिद्ध आहे. गिल धोनीला भेटण्यासाठी तीन महिन्यात दुसऱ्यांदा पायी चालत आला आहे. धोनीला भेटल्यानंतर माझे जीवन धन्य झाल्याचे अजय गिलने म्हटले. अजयने त्याच्या बाबतीत सांगताना म्हटले की, “मी शपथ घेतली होती की मी तोपर्यंत क्रिकेट खेळणार नाही जोपर्यंत मला धोनी आशिर्वाद देणार नाही. १५ ऑगस्ट २०२० ला मी धोनीसोबत क्रिकेट खेळणे सोडू दिले आणि आता पुन्हा सुरू करणार आहे”. अजयने सांगितले की त्याचे बारावी पर्यंत शिक्षण झाले आहे सध्या तो त्याच्या शहरात न्हावी म्हणून काम करत आहे.

अजय क्रिकेटमध्ये त्याचे करियर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. धोनीचे आशिर्वाद मिळाल्यानंतर पुन्हा नव्याने करियरची सुरूवात करणार आहे. अजयने धोनीला भेटल्यानंतर १४३६ किलोमीटर केलेल्या पायी प्रवासाचा फायदा झाल्याचे सांगितले.


हे ही वाचा: PV Sindhu : पी.व्ही. सिंधूचा इंडोनेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश