घरक्रीडाधोनीचा असाही रेकॉर्ड

धोनीचा असाही रेकॉर्ड

Subscribe

भारतासाठी ५०० वी आंतराष्ट्रीय मॅच खेळण्याचा रेकॉर्ड धोनीच्या नावावर जमा होणार आहे. महेंद्रसिंग धोनी हा तिसरा भारतीय खेळाडू ५०० वी आंतरराष्ट्रीय मॅच खेळणार आहे.

भारत आणि इंग्लंड दरम्यान टी २० सिरीजमधील दुसरी मॅच शुक्रवारी होणार आहे. टीम इंडिया सध्या चांगल्या फॉर्म आहे. या मॅचमध्ये भारत काय कामगिरी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष तर लागलं आहेच. पण ही मॅच खास आहे ती भारताचा लाडका विकेटकिपर महेंद्रसिंग धोनीसाठी. अप्रतिम फिनिशर म्हणून ओळखल्या जाणारा धोनी शुक्रवारच्या या मॅचमध्ये नवा रेकॉर्ड बनवणार आहे.

५०० वी मॅच खेळणारा तिसरा भारतीय खेळाडू

भारतासाठी ५०० वी आंतराष्ट्रीय मॅच खेळण्याचा रेकॉर्ड धोनीच्या नावावर जमा होणार आहे. महेंद्रसिंग धोनी हा तिसरा भारतीय खेळाडू ५०० वी आंतरराष्ट्रीय मॅच खेळणार आहे. सध्या या यादीमध्ये भारताचा महान बॅट्समन सचिन तेंडुलकर असून दुसऱ्या क्रमांकावर ‘द वॉल’ अर्थात राहुल द्रविड आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू पाहिल्यास, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडच्या नावांच्या मध्ये इतरही अनेक नावं आहेत. पण भारतीय नावांमध्ये आता महेंद्रसिंग धोनीचाही समावेश होणार आहे. या यादीत ६६४ मॅचसह पहिला क्रमांक सचिनचा असून दुसरा श्रीलंकेचा महेला जयवर्धने ६५२ मॅच, तिसरा श्रीलंकेचाच कुमार संगकारा ५९४ मॅच, ऑस्ट्रलियाचा रिकी पाँटिंग ५६० मॅच, दक्षिण आफ्रीकेचा जॅक कॅलिस ५१६ आणि त्यानंतर राहुल द्रविडचा ५०९ मॅचसह क्रमांक लागतो.

- Advertisement -

धोनीनं भारतासाठी मिळवलेलं यश

धोनीनं आतापर्यंत ४९९ मॅच खेळल्या असून शुक्रवारी ५०० वी मॅच खेळेल. एमएस धोनीनं २००४ मध्ये पहिली मॅच खेळली आणि गेली १४ वर्ष धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. धोनीनं आपल्या कॅप्टन्सीमध्ये भारताला बरंच यश मिळवून दिलं. २००७ मध्ये पहिला टी२० वर्ल्ड कप, २०११ मधील वनडे वर्ल्ड कप आणि २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतानं जिंकली आहे. २०१७ मध्ये धोनीनं कॅप्टन्सी सोडली असली तरीही अजूनही टीम इंडियासाठी विराट कोहली नेहमीच धोनीबरोबर सल्लामसलत करताना दिसत असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -