भारतीय संघापासून दूर पण केदारची तुफान खेळी अद्याप सुरूच; रणजीमध्ये ठोकले द्विशतक

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघापासून दुर असलेला केदार जाधव सातत्याने कमालीची कामगिरी करत आहे. नुकताच रणजी ट्रॉफी 2022-23 च्या एलिट ग्रुप बी सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना त्याने आसामविरुद्ध द्विशतक झळकावले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघापासून दुर असलेला केदार जाधव सातत्याने कमालीची कामगिरी करत आहे. नुकताच रणजी ट्रॉफी 2022-23 च्या एलिट ग्रुप बी सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना त्याने आसामविरुद्ध द्विशतक झळकावले आहे. (Maharashtra Kedar Jadhav scored double century 287 against Assam in the Ranji Trophy)

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आसामच्या संघाने पहिल्या डावात अवघ्या 274 धावा केल्या होता. त्यानंतर आसामने दिलेल्या 274 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राने केदार जाधवच्या द्विशतकाच्या जोरावर मोठी आघाडी घेतली.

तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या संघाने 147 षटकांपर्यंत 9 बाद 594 धावा केल्या. केदार जाधवने 100च्या स्ट्राईक रेटने 283 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 21 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश होता. 287 चेंडूत 287 धावांची त्याची खेळी सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी तो फ्लॉप ठरल्याने त्याला मिनी लिलावाच्या यादीतून वगळण्यात आले होते. मात्र, केदार आयपीएलच्या मिनी लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर देखील चर्चेत आला आहे.

दरम्यान, डिसेंबर 2018 मध्ये केदारने छत्तीसगडविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर आज त्याने प्रथम श्रेणीत द्विशतकी खेळी केली. भारताकडून 2020मध्ये केदार जाधवने अखेरचा वनडे तर 2017मध्ये अखेरचा ट्वेंटी-20 सामना खेळला होता. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) केदार जाधव चेन्नई सुपर किंग्स संघाचा खेळाडू होता.

अम्बी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या मैदानावरील फलंदाजीला साथ मिळणाऱ्या खेळपट्टीवर महाराष्ट्राच्या फलंदाजांनी मुक्तपणे फलंदाजी केली. सिद्धेश वीर आणि केदार जाधव यांनी तिसऱ्या गडय़ासाठी २१२ धावांची नाबाद भागीदारी केली. त्यापूर्वी, सिद्धेशने नौशादच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावा जोडल्या.


हेही वाचा – Asia Cup 2023 : यंदाही भारत-पाकिस्तान क्रिकेट युद्ध रंगणार; बीसीसीआयच्या जय शाहांची माहिती