घरक्रीडाकाझी, मोरेची शतके

काझी, मोरेची शतके

Subscribe

महाराष्ट्राच्या पहिल्या डावात ४३४ धावा

अझीम काझी आणि विशांत मोरे यांच्या शतकांमुळे झारखंडविरुद्ध रणजी सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावात ४३४ धावा केल्या. दिवसभराचा खेळ संपायला अवघा काही मिनिटांचा अवधी असताना महाराष्ट्राच्या मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात दोन बळी टिपून झारखंडला जोरदार झटका दिला. त्यामुळे दुसर्‍या दिवसअखेर झारखंडची २ बाद २ अशी अवस्था झाली आहे.

नागोठण्याच्या रिलायन्स मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात महाराष्ट्राची ५ बाद ८८ अशी अवस्था झाली होती. मात्र, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या काझी आणि मोरे यांनी चिवट झुंज दिल्याने महाराष्ट्राने ४०० धावांचा टप्पा पार केला. काझीने ३४९ चेंडूत १५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १४०, तर मोरेने १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १२० धावा केल्या. खेळ संपायला काही मिनिटे शिल्लक असताना राहुल शुक्लाने अक्षय पालकरला बाद करत महाराष्ट्राचा डाव ४३४ धावांवर संपुष्टात आणला. झारखंडकडून उत्कर्ष सिंहने ५ गडी बाद केले.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र – पहिला डाव ४३४ (अझीम काझी १४०, विशांत मोरे १२०; उत्कर्ष सिंह ५/१३०) वि. झारखंड – पहिला डाव १ षटकात २ बाद २ (मुकेश चौधरी २/२).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -