घरक्रीडानाशिकच्या अमेय खोंडला सुवर्ण

नाशिकच्या अमेय खोंडला सुवर्ण

Subscribe

महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धा

नाशिकच्या अमेय खोंडने ठाणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर १५ व १७ वर्षांखालील आंतर जिल्हा आणि राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याने या स्पर्धेच्या रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईच्या तनिष्क सक्सेनाचा २२-२०, २२-२० असा सरळ गेममध्ये पराभव करत ही स्पर्धा जिंकली.

त्याआधी अमेयने उपांत्यपूर्व फेरीत पुण्याच्या प्रथम वाणीवर २१-७, २१-८ असा, तर उपांत्य फेरीत सांगलीच्या प्रथमेश कुलकर्णीवर २१-१४, २१-१७ अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच दुहेरीतही अमेयने आपली चमक दाखवली. त्याने तनिष्क सक्सेनाच्या साथीने खेळताना रौप्यपदक मिळवले. दुहेरीच्या अंतिम फेरीत त्यांचा आर्य ठाकोरे व ध्रुव ठाकोरे यांच्याकडून १०-२१, १४-२१ असा पराभव झाल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

- Advertisement -

अमेय खोंड नाशिक जिमखाना येथे डॉ. अमित देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिमखान्याचे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड, जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, उपाध्यक्ष डॉ. शर्मिला कुलकर्णी, माजी अध्यक्ष एस. राजन, योगेश एकबोटे, पराग एकांडे, नाशिक जिमखान्याचे सहसचिव शेखर भंडारी, अभिषेक छाजेड आदींनी अभिनंदन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -