घरक्रीडास्वप्नील शिंदे, अंकिता जगताप कर्णधारपदी

स्वप्नील शिंदे, अंकिता जगताप कर्णधारपदी

Subscribe

सिनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर

भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने राजस्थान कबड्डी असोसिएशनच्या वतीने होणार्‍या ६७ व्या सिनियर गट पुरुष/ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राने आपले दोन्ही संघ जाहीर केले आहेत. रत्नागिरीच्या स्वप्नील शिंदेची पुरुष संघाच्या, तर पुण्याच्या अंकिता जगतापची महिला संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. यंदा राष्ट्रीय स्पर्धा २ ते ६ मार्च या कालावधीत जयपूर येथे होणार आहे.

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांमध्ये बर्‍याच नवोदितांना संधी देण्यात आली आहे. पुरुष संघात रत्नागिरी आणि मुंबई शहरचे सर्वाधिक ३-३ खेळाडू आहेत. महिला संघामध्ये पुणे, मुंबई उपनगरच्या ३-३ खेळाडू आहेत. तसेच मुंबई शहरच्या २ आणि ठाणे, औरंगाबाद, पालघर, सातार्‍याच्या १-१ खेळाडू आहेत. दोन्ही संघ सध्या रोहा-रायगडला सराव करत आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्राचे संघ –

पुरुष : स्वप्नील शिंदे (कर्णधार, रत्नागिरी), शुभम शिंदे (रत्नागिरी), रोहन बन्न (सांगली), बिपीन थळे (रायगड), आकाश कदम (मुंबई उपनगर), सुशांत साईल (मुंबई शहर), तुषार पाटील (कोल्हापूर), अजिंक्य पवार (रत्नागिरी), पंकज मोहिते (मुंबई शहर), मनोज बोन्द्रे (पुणे), संकेत सावंत (मुंबई शहर), महारुद्र गर्जे (बीड). [प्रशिक्षक – आशिष म्हात्रे, व्यवस्थापक – संतोष भोसले].

महिला : अंकिता जगताप (कर्णधार, पुणे), पूजा शेलार (पुणे), पौर्णिमा जेधे (मुंबई शहर), सायली जाधव (मुंबई उपनगर), सुवर्णा लोखंडे (औरंगाबाद), सोनाली हेळवी (सातारा), मेघा परब (मुंबई शहर), तेजस्वी पाटेकर (मुंबई उपनगर), ऐश्वर्या काळे-ढवण (पालघर), श्रद्धा चव्हाण (पुणे), पूजा जाधव (मुंबई उपनगर), निकिता कदम (ठाणे). [प्रशिक्षिका – सिमरन गायकवाड, व्यवस्थापिका – अनघा कांगणे].

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -