घरक्रीडामहाराष्ट्राचा महिला संघ उपांत्य फेरीत

महाराष्ट्राचा महिला संघ उपांत्य फेरीत

Subscribe

कुडाळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या आंतर राज्य सांघिक महिला गटात महाराष्ट्राच्या संघाने उप-उपांत्य फेरीत आसामला ३-० असे पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. एकेरीमध्ये महाराष्ट्राच्या स्नेहा मोरेने आसामच्या हिमांकशी बैद्यला २५-२, २५-११ असे आणि महाराष्ट्राच्या प्रीति खेडेकरने शर्मिला बोराला २५-०, २५-५ असे पराभूत केले. दुहेरीच्या लढतीत महाराष्ट्राच्या मैत्रेयी गोगटे आणि मीनल लेले या जोडीने आसामच्या मुन्नी बेगम आणि बंदिनी बारुआ या जोडीला २५-०, २५-५ असे नमवले. तसेच आंध्र प्रदेशने तेलंगणाचा २-१ असा, तामिळनाडूने चंदीगडचा २-१ असा आणि बिहारने उत्तर प्रदेशचा ३-० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

आंतर संस्था सांघिक पुरुष गटात पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड, एअर इंडिया, रिझर्व्ह बँक आणि जैन इरिगेशन या संघानी आपापले साखळी सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला गटात पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड, आयुर्विमा महामंडळ, बी.एस.एन.एल आणि जैन इरिगेशन या संघानी उपांत्य फेरी गाठली.

- Advertisement -

आंतर राज्य पुरुष सांघिक गटाच्या उप-उपांत्य फेरीत तेलंगणाने आसामवर २-१ अशी मात केली. कर्नाटकाने दिल्लीला २-१ असे पराभूत केले. तामिळनाडूने आंध्र प्रदेशला ३-० असे, तर विदर्भाने उत्तर प्रदेशला २-१ असे नमवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -