घरक्रीडारायफल बिघडली पण त्याची एकाग्रता कमी झाली नाही ! निमेश जाधवची अभिमानास्पद...

रायफल बिघडली पण त्याची एकाग्रता कमी झाली नाही ! निमेश जाधवची अभिमानास्पद कामगिरी

Subscribe

तिरुअनंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये नवी मुंबईच्या १६ वर्षीय निमेश जाधवने रौप्यपदक पटकावले.

केरळमधील तिरुअनंतपुरम येथे ६२वी राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत नवी मुंबईच्या निमेश जाधवने रौप्यपदक पटकावले. मात्र, त्याने या स्पर्धेत केलेली कामगिरी खूपच अभिमानास्पद होती. याचे कारण म्हणजे ही स्पर्धा सुरु होणार इतक्यातच त्याच्या रायफलमध्ये बिघाड झाला. मात्र, असे असले तरी त्याने आपली एकाग्रता भंग होऊ दिली नाही. स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित तंत्रज्ञांनी १०-१५ मिनिटांत त्याची रायफल दुरुस्त करून दिली. याच रायफलने त्याने दमदार कामगिरी करत या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. तर निमेशने शिवराज सावंत आणि ओमकार उकिरडे या दोन सहका-यांसह सीनियर सिव्हिलियन कॅटेगरीमध्ये महाराष्ट्राला सांघिक रौप्यपदक मिळवून दिले. तसेच त्याच्या या दमदार कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे घेतल्या जाणाऱ्या पात्रता फेरीसाठीही निमेश पात्र ठरला आहे.

दररोज ऐरोलीहूल पार्ल्याला ये-जा

निलेश हा नवी मुंबईमधील ऐरोलीचा रहिवासी आहे. तिथे सरावासाठी फारशा सुविधा उपलब्ध नसल्याने त्याला विलेपार्ले येथे सरावासाठी यावे लागते. त्याची घरची परिस्थितीही बेताची असल्याने त्याला स्वत:ची रायफलही विकत घेता आलेली नाही. मात्र विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांच्या सहकार्याने आणि तिथल्या शूटिंग रेंजचे प्रशिक्षक जितेश कदम आणि स्नेहल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निमेश रायफल शूटिंग स्पर्धांसाठीची जोरदार तयारी करत आहे. आपल्या शूटिंगच्या सरावात कोणताही खंड पडू नये यासाठी ऐरोलीच्या निमेशने पार्ल्याच्याच साठ्ये महाविद्यालयात प्रवेश घेतला असून तो दररोज ऐरोलीहूल पार्ल्याला ये-जा करतो. निलेशने यावर्षी दमदार प्रदर्शन केले आहे. त्याने शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तर शालेय डिएसओ स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले होते.   
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -