Eco friendly bappa Competition
घर क्रीडा Mahendra Singh Dhoni : वानखेडे स्टेडियममधील दोन खुर्च्यांचा होणार लिलाव; धोनीशी आहे...

Mahendra Singh Dhoni : वानखेडे स्टेडियममधील दोन खुर्च्यांचा होणार लिलाव; धोनीशी आहे खास संबंध

Subscribe

Mahendra Singh Dhoni : भारत यंदा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे (ODI World Cup 2023) यजमानपद भूषवणार आहे. त्याआधीच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीशी (Mahendra Singh Dhoni) संबंधित एक बातमी समोर येत आहे. भारतात आयोजित 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महेंद्र सिंग धोनी याने शेवटच्या चेंडूवर सिक्स मारत सामना जिंकून दिला होता. षटकार मारल्यानंतर चेंडू ज्या खुर्च्यांवर जाऊन पडला त्या खुर्च्यांचा आता लिलाव करण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) घेतला आहे. (Mahendra Singh Dhoni Two chairs at Wankhede Stadium to be auctioned Has a special relationship with Dhoni)

हेही वाचा – ‘पृथ्वी शॉ’ च्या अडचणीत वाढ; दीर्घकाळासाठी क्रिकेटपासून राहावे लागणार दूर

- Advertisement -

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीचे भारतासह जगभरात चाहते आहेत. महेंद्र सिंग धोनीने आतापर्यंत तीन आयसीसी स्पर्धांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. 2011 मध्ये भारतात आयोजित केलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या श्रीलंकेसोबत खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात संघाचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर षटकार ठोकून भारताला विश्वविजेता बनवले होते. धोनीने षटकार मारलेला चेंडू ज्या खुर्च्यांवर जाऊन पडला त्यांचा आता लिलाव होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने धोनीने मारलेला चेंडू ज्या खुर्च्यांवर पडला त्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

सचिन तेंडुलकर स्टँडमधीलही खुर्च्यांचा होणार लिलाव

- Advertisement -

मुंबई क्रिकेट असोसिएशनने विश्वचषक 2023 साठी महेंद्रसिंग धोनीसह सचिन तेंडुलकरच्या लेव्हल डी च्या 300 खुर्च्या 3 कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सात बॉक्सच्या 140 जागा 2.66 कोटी रुपयांना विकणार आहे. विश्वचषकाचे पाच सामने मुंबईतील वानखेडे खेळवण्यात येणार आहेत. 2011 मध्येही विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता, परंतु यंदा विजेतेपदाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

भारतासाठी वानखेडे स्टेडियम ऐतिहासिक

भारतीय संघाने 2011 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. मात्र भारतातील करोडो चाहत्यांना आजही धोनीचा सिक्स चांगलाच आठवत आहे. कारण भारतीय संघ तब्बल 28 वर्षांनंतर वर्ल्ड चॅम्पियन बनली होती. त्यामुळे धोनीने मारलेला षटकार अजूनच खास आहे. 2023 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातही अनेक सामने वानखेडेवर खेळवले जाणार आहेत. त्यामुळे वानखेडे स्टेडियम भारतासाठी एकप्रकारे ऐतिहासिक मैदान आहे.

हेही वाचा – Birth certificate : 1 ऑक्टोबरपासून बदणार नियम बदलणार; सरकार दरबारी फक्त जन्मप्रमाणपत्र महत्त्वाचे

भारत तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनणार?

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 मध्ये पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर धोनीने 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि त्यानंतर 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावून दिले होते. भारताला विश्वचषक जिंकून आता 12 वर्षे झाली असून यावर्षी पुन्हा एकदा विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. अशा स्थितीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह भारतीय चाहत्यांना विश्वचषक ट्रॉफी भारतातच राहावी अशी आशा आहे. त्यामुळे भारत तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनणार का? हे पाहावे लागेल.

- Advertisment -