घरक्रीडाMSD : महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा!

MSD : महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा!

Subscribe

जी घडी येऊच नये अशी देशभरातले क्रिकेट चाहते प्रार्थना करत होते, ती घडी अखेर आली आहे. भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या रिटायरमेंटविषयी बरीच चर्चा सुरू होती. कोरोनामुळे आयपीएल आणि त्यापाठोपाठ टी-२० वर्ल्डकप देखील पुढे ढकलला गेला. या पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये खेळल्यानंतर धोनी पुढे वर्ल्डकपमध्ये खेळेल का? याविषयी निर्णय होईल असं वाटत असताना या दोन्ही स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्यामुळे धोनीच्या पुढच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असतानाच कॅप्टन कूलने निवृत्तीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे कोणताही मोठा कार्यक्रम न करता धोनीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अवघ्या दोन ओळींचा संदेश टाकून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

- Advertisement -

धोनीनं याआधीच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. मात्र, तो वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल अशी आशा त्याच्या चाहत्यांना होती. भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर जिंकायची सवय लावणारा कर्णधार ही ओळख सौरव गांगुलीनंतर महेंद्रसिंह धोनीची झाली होती. त्या पाठोपाठा धोनीनं भारताला टी-२० वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारताला नंबर वन स्थान मिळवून देणाऱ्या कर्णधार धोनीचे भारतातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहेत. त्या धोनीची आंतरराष्ट्रीय निवृत्ती ही त्याच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, असं असलं, तरी धोनी आयपीएलमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे धोनीला खेळताना पाहण्याची त्याच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण जरी होणार असली, तरी त्याला भारताकडून खेळताना पाहता येणार नसल्यामुळे त्याचे लाखो चाहते नाराज झाले आहेत.

धोनीचं टेस्ट करिअर (२००५ ते २०१४)

मॅच – ९०
रन – ४८७६
शतक – ६
सर्वोच्च धावसंख्या – २२४
बॅटिंग सरारसी – ३८.०९
कॅच – २५६
स्टंपिंग – ३८

- Advertisement -

धोनीचं वन डे करिअर (२००४ ते २०१९)

मॅच – ३५०
रन – १०७७३
शतक – १०
सर्वोच्च धावसंख्या – १८३
बॅटिंग सरारसी – ५०.५७
कॅच – ३२१
स्टंपिंग – १२३
विकेट – १

धोनीचं टी-२० करिअर (२००६ ते २०१९)

मॅच – ९८
रन – १६१७
शतक – ०
सर्वोच्च धावसंख्या – ५६
बॅटिंग सरारसी – ३७.६०
कॅच – ५७
स्टंपिंग – ३४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -