घरक्रीडाEPL Football : मँचेस्टर युनायटेडचा विक्रमी विजय; साऊथहॅम्पटनचा उडवला ९-० असा धुव्वा 

EPL Football : मँचेस्टर युनायटेडचा विक्रमी विजय; साऊथहॅम्पटनचा उडवला ९-० असा धुव्वा 

Subscribe

या विजयामुळे युनायटेडने प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात दुसरे स्थान राखले.

मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात साऊथहॅम्पटनचा ९-० असा धुव्वा उडवला. त्यामुळे युनायटेडने प्रीमियर लीग स्पर्धेतील सर्वात मोठ्या विजयाशी बरोबरी केली. याआधी १९९५ मध्ये युनायटेडनेच इपस्विचचा ९-० असा पराभव केला. साऊथहॅम्पटनविरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे युनायटेडने प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात दुसरे स्थान राखले. त्यांचे २२ सामन्यांत ४४ गुण असून अव्वल स्थानावरील मँचेस्टर सिटीचेही ४४ गुण आहेत. मात्र, त्यांनी युनायटेडपेक्षा दोन सामने कमी खेळले आहेत. दुसरीकडे क्रिस्टल पॅलेसने न्यूकॅसलवर २-१ अशी मात केली. पॅलेसकडून जायरो रिडेवाल्ड आणि गॅरी केहिल यांनी गोल केले. तसेच रूबेन नेवेस आणि जाओ मुटिन्हो यांच्या गोलमुळे वोल्व्हसने आर्सनलचा २-१ असा पराभव केला.

मार्शियालचे दोन गोल

मँचेस्टर युनायटेडविरुद्धच्या सामन्यात दुसऱ्याच मिनिटाला साऊथहॅम्पटनच्या अ‍ॅलेक्स यांकेविट्झला रेड कार्ड मिळाले. त्यामुळे साऊथहॅम्पटनला १० खेळाडूंनी खेळावे लागेल. याचा फायदा घेत युनायटेडने मध्यंतराला ४-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धातही युनायटेडने आक्रमक खेळ सुरु ठेवला. त्यामुळे त्यांनी हा सामना ९-० असा जिंकला. त्यांच्याकडून अँथनी मार्शियालने दोन, तर अ‍ॅरॉन वॅन-बिसाका, बेडनारेक (स्वयं गोल), एडींसन कवानी, स्कॉट मॅकटोमने, ब्रुनो फर्नांडेस आणि डॅनियल जेम्स यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला.

- Advertisement -

हेही वाचा – टॉटनहॅमला पराभवाचा धक्का; लिव्हरपूल विजयी  


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -