घरक्रीडाHijab Controversy: हिजाब वाद आता आंतरराष्ट्रीय पातळीवर, मँचेस्टर युनायटेडच्या फ्रेंच फुटबॉलरकडून पोस्ट...

Hijab Controversy: हिजाब वाद आता आंतरराष्ट्रीय पातळीवर, मँचेस्टर युनायटेडच्या फ्रेंच फुटबॉलरकडून पोस्ट शेअर

Subscribe

कर्नाटकमधील उड्डपी येथून सुरू झालेल्या हिजाब वादाचे लोण आता आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटायला सुरूवात झाली आहे. या वादात इंग्लिश फुटबॉल क्लब मॅंचेस्टर युनायटेच्या फ्रेंच फुटबॉलरने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे या वादात आता फ्रेंच फुटबॉलर पॉल पोग्बाने देखील यामध्ये एन्ट्री केली आहे. पॉल पोग्बाने इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये एक विद्यार्थी भगवी शाल गळ्यात घालून घोषणाबाजी करताना दिसत आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यीनी हिजाब घालून घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

पोग्बाने इन्स्टाग्राम पोस्टवर काय लिहिलं ?

फ्रेंचचा मिडफिल्डर पॉल पोग्बाने एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने लिहिलंय की, भारतातील कॉलेजमध्ये हिजाब घातलेल्या मुलींना तेथील गर्दीने संताप दिला. या व्हिडिओच्या खाली त्याने .islamismydeen. असं लिहिलं आहे.

- Advertisement -

काय आहे नेमका हिजाब वाद?

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात हिजाब घालण्यावरून वाद सुरू झाला. उडुपी येथील कॉलेजमधील काही विद्यार्थींनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र त्यांना अडवण्यात आले. कॉलेज प्रशासनाने ड्रेसमध्ये समानता असावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. पण यावरून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाद वाढत गेला. याप्रकरणी विद्यार्थींनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

- Advertisement -

कर्नाटकात सुरु झालेला हिजाबचा वाद अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे याविषयावर योग्यती पाऊले उचलण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज उच्चस्तरीय बैठक घेणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकारी सहभागी होणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री या वादाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

दरम्यान, धार्मिक पोशाख हिजाबवर बंदी घालण्याच्या आदेशानंतर कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राजकीय नेते सुद्धा या निमित्ताने आमने-सामने आले आहेत. दिल्ली आणि मुंबईत सुद्धा जोरदार विरोध केला जात आहे.


हेही वाचा : Kirit Somaiya Pune : सोमय्यांचा सत्कार अन् मनपा पायऱ्यांचे गोमुत्राने काँग्रेसकडून शुद्धीकरण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -