घरक्रीडाजपान ओपन स्पर्धा : मनू अत्री-सुमिथ रेड्डी उपांत्यपूर्व फेरीत

जपान ओपन स्पर्धा : मनू अत्री-सुमिथ रेड्डी उपांत्यपूर्व फेरीत

Subscribe

भारताची जोडी मनू अत्री आणि सुमिथ रेड्डी यांनी जपान ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या जोडीचा पराभव केला.

भारताची जोडी मनू अत्री आणि सुमिथ रेड्डी यांनी जपान ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी मलेशियन जोडी गोह व्ही शेम आणि टॅन वी किओंग यांचा १५-२१, २३-२१, २१-१९ असा पराभव केला.

असा झाला सामना

या सामन्यात मलेशियन जोडीने चांगली सुरूवात केली. त्यांनी या सामन्याचा पहिला सेट १५-२१ असा जिंकला. पण दुसर्‍या सेटमध्ये अत्री-रेड्डी जोडीने चांगले पुनरागमन केले. या सेटमध्ये १७-१९ असे ते पिछाडीवर होते. पण त्यांनी आपला खेळ उंचावत हा सेट २३-२१ असा जिंकला. तर या सामन्याचा तिसरा सेट पुन्हा चुरशीचा झाला. अत्री-रेड्डी जोडीने हा सेट २१-१९ असा जिंकत हा सामनाही जिंकला. त्यामुळे त्यांनी जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असणार्‍या मलेशियन जोडीला पराभवाचा धक्का दिला.

- Advertisement -

 

- Advertisement -

इतरत्र निराशा 

दुसरीकडे पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रणकिरेड्डी-चिराग शेट्टी आणि महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा-एन सिक्की रेड्डी यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. सात्विकसाईराज रणकिरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीचा टाकेशी कामुरा-किएगो सोनोडा या जपानी जोडीने १२-२१, १७-२१ असा पराभव केला. तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा-एन सिक्की रेड्डी यांचा चांग ये ना-जुंग क्यून्ग युन या जोडीने १७-२१,१३-२१ असा पराभव केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -