घरक्रीडाIND vs NZ : न्यूझीलंडच्या या खेळाडूने कोहलीचा विक्रम काढला मोडीत; टी-२०...

IND vs NZ : न्यूझीलंडच्या या खेळाडूने कोहलीचा विक्रम काढला मोडीत; टी-२० मध्ये केल्या सर्वाधिक ३२४८ धावा

Subscribe

न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलने विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढत आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहेत.

न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गुप्टीलने शुक्रवारी झालेल्या रांचीच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर भारताविरूध्दच्या तीन टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीला मागे टाकत एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. दुसऱ्या सामन्यात त्याने कोहलीला मागे टाकत आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. गुप्टीलला कोहलीच्या विक्रमापर्यंत पोहचण्यासाठी केवळ ११ धावांची गरज होती. अशातच भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. डावाच्या सुरूवातीला पहिल्याच षटकांत भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर गुप्टीलने चौकार मारून हा विक्रम त्याच्या नावावर केला.

न्यूझीलंडचा सलग दुसऱ्या सामन्यात देखील पराभव पत्करावा लागला पण गुप्टीलने ३१ धावांची साजेशी खेळी करून संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. गुप्टीलने पहिल्याच षटकांत मारलेल्या चौकारामुळे कोहलीच्या ३२२७ धावांना मागे टाकत टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावला. गुप्टीलने १११ सामन्यांत ३२४८ धावा केल्या आहेत तर कोहलीच्या नावावर ९५ सामन्यांत ३२२७ धावांची नोंद आहे. दरम्यान भारतीय टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा ३०८६ धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच २६०८ धावांसह चौथ्या तर आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग २५७० धावांसह पाचव्या स्थानावर आहे.

- Advertisement -

न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टीलला त्याची व्यक्तिगत धावसंख्या ८ असताना जीवनदान मिळाले होते जेव्हा के.एल राहुलकडून एक कठीण झेल सुटला होता. मात्र ५ व्या षटकातं गुप्टील १५ चेंडूत ३१ धावांची साजेशी खेळी करून दीपक चाहरच्या चेंडूवर बाद झाला.


हे ही वाचा: IND vs NZ : कर्णधार रोहित शर्माचे मोठे वक्तव्य; म्हणाला खेळाडूंना स्वातंत्र्य…

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -