घरक्रीडामास्टर-ब्लास्टरने दिल्या जॉन्टी ऱ्होड्सला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मास्टर-ब्लास्टरने दिल्या जॉन्टी ऱ्होड्सला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Subscribe

क्रिकेट जगतात सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकटपटू जॉन्टी ऱ्होड्स याला क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याच्या क्षेत्ररक्षणाचं कौतुक केलं आहे.

क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हटला की ज्याचं नाव आठवतं त्या जॉन्टी ऱ्होड्सचा आज वाढदिवस. जॉन्टीवर क्रिकेटजगातून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच सचिन तेंडुलकरनेही आपल्या शैलीत जॉन्टीचं कौतुक करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आजही जगातील सर्वात श्रेष्ठ क्षेत्ररक्षक तूच आहेस’ अशा शब्दांत सचिनने जॉन्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

अशा दिल्या सचिनने शुभेच्छा!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट टाकत जॉन्टी ऱ्होड्सला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने लिहिले की,”क्रिकेटमध्ये तू क्षेत्ररक्षणाची परिभाषा बदलली आहेस आणि आजही तुझ्यासारखे क्षेत्ररक्षण कोणाला जमत नाही.” सचिनने या पोस्टसोबतच जॉन्टीचा एक अप्रतिम क्षेत्ररक्षण करतानाचा फोटोही पोस्ट केला आहे. सचिन दरवेळी आपल्या वेगळ्या आणि खास शुभेच्छांमुळे चर्चेत असतो. आजही सचिनने जॉन्टी ऱ्होड्सला दिलेल्या खास शुभेच्छा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

जॉन्टी आणि भारताचं भावनिक नातं

जॉन्टी ऱ्होड्स हा जरी दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू असला तरी त्याचं भारतासोबतचं नातं अतूट असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे जॉन्टीने आपल्या मुलीचं नावही ‘इंडिया’ असं ठेवलं आहे. त्याचसोबत त्याने आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्स संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

jonty rhodes daughter india
जॉन्टी ऱ्होड्सची मुलगी ‘इंडिया’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -