घरक्रीडाIND vs NZ Test Series : मयंक अग्रवालचे माजी क्रिकेटरकडून कौतुक; म्हणाला,...

IND vs NZ Test Series : मयंक अग्रवालचे माजी क्रिकेटरकडून कौतुक; म्हणाला, ही सेहवागची…

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरूध्दचा दुसरा कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकला

भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरूध्दचा दुसरा कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकला. गोलंदाजांचा दबदबा राहिलेल्या या सामन्यात मयंक अग्रवालने फलंदाजीतून सर्वांची मने जिंकली. अग्रवालने पहिल्या डावात १५० आणि दुसऱ्या डावात ६२ धावांची शानदार खेळी केली. त्याने कसोटी सामन्यात देखील टी-२० सामन्याचा आभास देत मोठ-मोठे षटकार मारून न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच परिक्षा घेतली. लक्षणीय बाब म्हणजे मयंकने सामन्यात एकूण २१२ धावा केल्या ज्या न्यूझीलंडच्या पूर्ण संघापेक्षा थोड्या कमी आहेत. न्यूझीलंडच्या संघाने दोन्ही डावात फक्त २२९ धावा केल्या होत्या.

दरम्यान मयंक अग्रवालच्या शानदार खेळीच्या बदल्यात त्याला सामानवीर म्हणून घोषित करण्यात आले. मयंक अग्रवालने १५० धावांच्या खेळीत १७ चौकार आणि ४ षटकार मारले. त्यानंतर त्याने ६२ धावांच्या खेळीत १० चौकार आणि १ षटकार मारला. दरम्यान माजी क्रिकेटर संजय बांगर यांनी मयंक अग्रवालच्या फलंदाजीचे खूप कौतुक केले. त्यांनी एका न्यूज वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, “मयंक वीरेंद्र सेहवागच्या शैलीत फलंदाजी करतो. तो सुरूवातीपासूनच आक्रमक खेळी करून गोलंदाजांवर दबाव राखून ठेवतो. आणि सेहवाग देखील याच पध्दतीने खेळायचा”.

- Advertisement -

दरम्यान सर्व क्रिकेटप्रेमींना कल्पना आहे की वीरेंद्र सेहवाग कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान फलंदाजी करायचा आणि याच कारणामुळे तो अनेकदा गोलंदाजांवर दबाव टाकायचा. मयंकची देखील शैली जवळपास सारखीच आहे. मयंकने १६ कसोटी सामन्यात ४७.९२ च्या सरासरीने १२९४ धावा केल्या आहेत. मयंकने १६ कसोटी सामन्यांमध्ये २८ षटकार आणि १५४ चौकार मारले आहेत. जे त्याच्या आक्रमक फलंदाजीबाबत सिध्द करते. सेहवागबद्दल बोलायचे झाले तर तो अशा मोजक्या फलंदाजांपैकी एक आहे ज्याने ९० किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत. सेहवागने १०४ कसोटी सामन्यात १२३३ चौकार आणि ९१ षटकार मारले आहेत.


हे ही वाचा: http://Davis Cup 2021 : रशियाने तब्बल १५ वर्षांनी जिंकला डेव्हिस कप; मेदवेदेव ठरला विजयाचा हिरो

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -