घरक्रीडाMayank Agarwal : विमानात मयंक अग्रवालची अचानक तब्येत बिघडली; आयसीयूमध्ये दाखल

Mayank Agarwal : विमानात मयंक अग्रवालची अचानक तब्येत बिघडली; आयसीयूमध्ये दाखल

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू मयंक अग्रवालची अचानक तब्येत बिघडल्याने त्याला आगरतळा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रणजी करंडक सामना खेळून तो आगरतळ्याहून परतत होता. 32 वर्षीय मयंक हा कर्नाटक संघाचा कर्णधार आहे. विमानात चढल्यानंतर त्याची तब्येत खराब झाल्याची माहिती समोर येत आहे. तोंडात आणि घशात जळजळ होत असल्याची तक्रार त्यांने केली. दरम्यान, मयंक अग्रवालवर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. (Mayank Agarwal health suddenly deteriorated on the plane Admitted to ICU)

हेही वाचा – Rahul Gandhi : दबाव निर्माण होताच यू-टर्न घेतला, पण…; राहुल गांधींचा नितीश कुमार यांना मिश्कील टोला

- Advertisement -

त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला सांगितले की, मयंक अग्रवालने आगरतळा येथून दुपारी अडीच वाजताचे विमान पडकले होते. विमानात चढल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. विमानात त्याला उलटी झाली. त्याला वेदना जाणवू लागल्यावर तो विमानातून उतरला. मला कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA) कडून शाहवीर तारापोर यांचा फोन आला आणि आम्ही आमच्या दोन प्रतिनिधींना तातडीने रुग्णालयात पाठवले. तो सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. आम्हाला सांगण्यात आले आहे की, डॉक्टर काही चाचण्या करत आहेत.

- Advertisement -

माध्यमातील वृत्तानुसार, बॉटल बंदचे पाणी प्यायल्यानंतर मयंकने तोंड आणि घशात जळजळ झाल्याची तक्रार केली. मयंकने अलीकडेच आगरतळा येथील स्टेडियमवर त्रिपुराविरुद्धच्या रणजी सामन्यात मैदानात उतरला होता. त्याने पहिल्या डावात 51 आणि दुसऱ्या डावात 17 धावा केल्या. यानंतर सोमवारी (29 जानेवारी) कर्नाटकने 29 धावांनी विजय मिळवला. कर्नाटकला 2 फेब्रुवारीपासून सुरतमध्ये रेल्वेविरुद्धचा सामना खेळायचा आहे. या सामन्यात मयंकला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा ‘या’ तारखेपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा, ‘हे’ आहे कारण

मयंक अग्रवाल 4 वर्षांपासून भारतीय संघाबाहेर

मयंक अग्रवाल बराच काळ भारतीय संघाबाहेर आहे. त्याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 5 फेब्रुवारी 2020 रोजी हॅमिल्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय सामना खेळला. मयंकने भारतीय संघासाठी आतापर्यंत 21 कसोटी आणि 5 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मयंकने कसोटीत 4 शतकांच्या मदतीने 1488 धावा जोडल्या तर एकदिवसीय सामन्यात त्याने केवळ 86 धावा केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -