घरक्रीडाNew MCC Laws : झेलबाद झाल्यावर नव्या खेळाडूलाच स्ट्राईकवर खेळावे लागणार, एमसीसीने...

New MCC Laws : झेलबाद झाल्यावर नव्या खेळाडूलाच स्ट्राईकवर खेळावे लागणार, एमसीसीने नियम बदलले

Subscribe

मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) ने क्रिकेट सामन्यादरम्यानच्या नियमांमध्ये बदल केला आहे. झेलबाद आणि मांकडिंगसंबंधित नियमांत हा बदल करण्यात आला आहे. तसेच चेंडूवर लाळेच्या वापरासही बंदी आणली आहे. आता जर कोणता खेळाडू झेलबाद झाला तर त्याला मैदानावर आल्यावर पहिला चेंडू खेळावा लागणार आहे. यापूर्वी झेलबाद झालेल्या खेळाडूसह जो मैदानावर असेल तो खेळत होता. परंतु आता बदल करण्यात आला असून नव्या खेळाडूला पहिला चेंडू खेळावा लागणार आहे. माकडिंगला आता रन आऊटचा भाग करण्यात आले आहे. मंकडिंगचा नियम नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. रनआऊटचा भाग बनवल्यास गोलंदाजांना अशा पद्धतीने विकेट घेणे सोपे जाणार आहे.

काय आहे झेलबादचा नियम?

झेलबादच्या नव्या नियमानुसार आता जो खेळाडू मैदानावर उतरेल त्याला पहिला चेंडू खेळावा लागणा आहे. जुन्या नियमानुसार जेव्हा कोणता गोलंदाज झेलबाद होतो. तेव्हा धावा घेण्यासाठी खेळाडू एक दुसऱ्याची जागा घेत असतात. नॉन स्ट्राईकवर असणारा गोलंदाज नवा चेंडू खेळायचा आणि झेलबाद झालेला खेळाडू स्ट्राईक सोडून नॉन स्ट्राईकच्या दिशेने पळत जायचा. नवा खेळाडूसुद्धा मैदानात आल्यावर नॉन स्ट्राईकवरुन खेळाला सुरुवात करायचा परंतु आता या नियमात बदल करण्यात आला आहे. नव्या खेळाडूला स्ट्राईकवरुन पहिला चेंडू खेळावा लागणार आहे. जर कोणता फलंदाज षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला तर नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाजच पुढच्या षटकाचा पहिला चेंडू खेळेल.

- Advertisement -

माकाडिंगचा नियम बदलला

गोलंदाज चेंडू टाकताना नॉन स्ट्राईकवर असणारा फलंदाज धावा घेण्यासाठी जागा सोडतो त्यावेळी गोलंदाज त्रिफळाचित्त करुन बाद करु शकतो. हा नियम नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. यापूर्वी हा नियम खेळाच्या भावनेविरुद्ध असल्याचे मानले जायचे. या प्रकारे जो गोलंदाज बाद करायचा त्यावर टीका करण्यात येत होती. या नियमात बदल करुन रन आऊटचा भाग करण्यात आले आहे. आतापासून माकडिंग पद्धतीने बाद होणारा फलंदाज धावबाद मानला जाणार आहे. फिरकी गोलंदाज अशा प्रकारे फलंदाजाला धावबाद करतात.

लाळ वापरण्यावर बंदी

वेगवान गोलंदाजांना लाळेचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सध्या जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोना काळात साथीच्या संसर्गाची शक्यता कमी करण्यासाठी लाळेच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. लाळेचा वापर न केल्याने चेंडूच्या स्विंगवर परिणाम होत नाही. यामुळे लाळेच्या वापरावर कायमची बंदी घालण्यात आली आहे. असे मानले जाते की, लाळेच्या वापरामुळे वेगवान गेलंदाजांना चेंडू स्विंग करता येतो.

- Advertisement -

हेही वाचा : Ind vs SL: कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा कसून सराव, खेळाडूंचा द्रविडसोबतचा फोटो व्हायरल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -