घरICC WC 2023ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमांची भारतावर टीका; वाचा, काय आहे कारण?

ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमांची भारतावर टीका; वाचा, काय आहे कारण?

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात भारतालाच पराभूत करून विजयी झाल्यानंतर देखील भारतावर ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमांकडून टीका करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातल्या प्रसारमाध्यमांनी भारतीय संघातल्या खेळाडू आणि प्रेक्षकांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे.

नवी दिल्ली : ICC Cricket World Cup 2023 च्या अंतिम सामन्यात भारताला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषकात सलग 10 सामने जिंकून सुद्धा भारताला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभूत करत विश्वचषक 2023 स्वतःच्या नावे केला. यामुळे 140 करोड भारतीयांची मने दुखावली आहेत. स्वतः कर्णधार रोहित शर्मा याला त्याचे रडू आवरता आले नाही. त्याच्या डोळ्यातील अश्रु हे काल अनेकांनी पाहिले. तर अनेक भारतीय काल रडले सुद्धा. परंतु, ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात भारतालाच पराभूत करून विजयी झाल्यानंतर देखील भारतावर ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमांकडून टीका करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातल्या प्रसारमाध्यमांनी भारतीय संघातल्या खेळाडू आणि प्रेक्षकांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे. ऑस्ट्रेलियातल्या माध्यमांनी लिहिले आहे की पॅट कमिन्स आणि त्याच्या टीमचा विजय त्यांना समजलाच नसेल कारण जेव्हा त्यांना विश्वचषक हाती देण्यात आला तेव्हा संपूर्ण मैदान रिकामे झाले होते. त्यामुळे त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. (media in Australia criticized the behavior of the Indian team players and spectators)

हेही वाचा – WC 2023 : पराभवानंतर भारतीय संघाचे मनोबल वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी ड्रेसिंग रुममध्ये

- Advertisement -

द क्रॉनिकल या वृत्तपत्राने ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर भारतावर टीका करत बातमी दिली आहे की, भारतीय खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यात खेळभावना दिसली नाही. ज्यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या हाती विश्वचषक दिला गेला, तेव्हा भारतीय खेळाडू आतून दुखावलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे जाणवत होते. जेव्हा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू विश्वचषक घेऊन तो क्षण साजरा करत होते, तेव्हा भारतीय खेळाडूंनी त्यांच्याकडे आणि त्या सोहळ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. याला खेळभावना म्हणतात का? असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.

तर, दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने देखील अंतिम सामन्याविषयी आपले मत व्यक्त केले. याबाबत पाँटिंग म्हणाला की, जी खेळपट्टी तयार करण्यात आली होती, त्याचा भारतावरच उलट परिणाम झाला. गेल्या महिन्यात खेळण्यात आलेल्या साखळी सामन्यात ज्या खेळपट्टीवर भारताने पाकिस्तानला नमवले आणि सात गडी राखून विजय मिळवला त्याच मैदानावर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवण्यात आला. ही खेळपट्टी अपेक्षेपेक्षा कमी वेगवान होती. त्यावर अपेक्षेपेक्षा चेंडू कमी फिरला. मात्र प्रत्येक खेळाडूने खेळपट्टीशी जुळवून घेत चांगली गोलंदाजी केली. याबाबतचे वृत्त हेराल्ड सन या वृत्तपत्राकडून छापण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -