मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे चौथा टेस्ट सामना खेळवला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियासाठी हा सामना अतितटीचा असून विजयासाठी दोन्ही संघ शर्तीचे प्रयत्न करत आहेत. एकिकडे मेलबर्नच्या मैदानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना सुरू होता तर, दुसरीकडे मैदानाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी भारताविरुद्ध घोषणाबाजी दिली. परिणामी इंडियन फॅन्स आणि खलिस्तानी समर्थक हे आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. (Melbourne ind vs aus 4th test Khalistan and Indian supporters clash outside ground video viral)
भारतीय चाहते आणि खलिस्तानी समर्थक यांच्यात आज (गुरूवार दि. 26 डिसेंबर) सकाळी वाद झाला आहे. यावेळी इंडियन फॅन्सची खलिस्तानी समर्थकांशी झटापट झाली, ज्यांना व्हिक्टोरिया पोलिसांनी नंतर पांगवले. मेलबर्न कसोटी सामन्याचे तिकीट नसतानाही खलिस्तानी समर्थकांनी सकाळीच तेथे येऊन गोंधळ घातला. मात्र, लवकरच परिस्थिती नियंत्रणात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Can’t get worst what they are doing with our national flag –
Good reply by Indian boys
In particular Haryana rockzz pic.twitter.com/LJGJoeRyDw— रोहित जुगलान Rohit Juglan (@rohitjuglan) December 25, 2024
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, खलिस्तानी समर्थकांचा एक गट तिकिटाविना घुसला होता आणि झेंडे फडकावत भारतविरोधी घोषणा देत होता, त्यामुळे व्हिक्टोरिया पोलिसांना त्यांना हटवावे लागले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, भारतीय चाहत्यांनी तिरंगा फडकावत आणि भारत समर्थक घोषणा देत त्यांच्या देशाचे समर्थन केले.
🚨 At Aus-Ind Match in Melbourne,
Pro Khalistan Sikhs Targeting AAP Supremo Kejriwal’s Puppet Bhagwant Mann to Internationalize Sikh Farm Leader Jagjit Dallewal’s Fast-unto-death , Fake Encounter of 3 Sikhs & Punjab CM Facilitating Firing of Russian Chemical Grenades on Farmers pic.twitter.com/BJ3DaGHJgu— Political Buzz (@Politicalbuzz77) December 26, 2024
दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 200 धावांचा टप्पा पार केला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पदार्पण करणाऱ्या सॅम कॉन्स्टासने ऑस्ट्रेलियाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. तो 60 धावा करून बाद झाला.
याशिवाय मार्नस लॅबुशेननेही अर्धशतक झळकावले. त्याने 72 धावांची खेळी खेळली. तसेच, स्टीव्ह स्मिथ यानेही आपले अर्धशतक पूर्ण केले असून मोठ्या खेळीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
हेही वाचा – IND vs AUS : ऑस्ट्रेलियन खेळाडूला भिडणे किंग कोहलीला पडले महागात, मिळाली ही शिक्षा