Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा ठरलं! आता तब्बल अडीच महिने रंगणार आयपीएलचा थरार, जाणून घ्या टीम इंडियाचं...

ठरलं! आता तब्बल अडीच महिने रंगणार आयपीएलचा थरार, जाणून घ्या टीम इंडियाचं शेड्युल

Subscribe

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी पुरुष क्रिकेटचा फ्यूचर टूर प्रोग्रॅम जारी केला आहे. २०२३ ते २०२७ दरम्यान पुरुष क्रिकेटमधील १२ संघ एकूण ७७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. यामध्ये १७३ कसोटी, २८१ वनडे आणि ३२३ टी-२० सामन्यांचा समावेश करण्यात आला आहे. जवळपास अडीच महिने आयपीएलचा थरार रंगणार आहे.

हे सर्व सामने आयसीसी स्पर्धा, द्विपक्षीय मालिका आणि तिरंगी मालिकेचा भाग असतील. हा कार्यक्रम पुरुष क्रिकेटमधील १२ देशांसाठी आहे. मार्चच्या मध्यापासून ते मे अखेरपर्यंतचा कालावधी आयपीएलला देण्यात आला आहे. या पाच वर्षांत आयपीएलला देण्यात आलेल्या विंडोत एकही आंतरराष्ट्रीय सामना होणार नाही.

- Advertisement -

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील सामन्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. २०२३ पासून कसोटी मालिकेतील सामन्यांची संख्या ४ वरून ५ करण्यात आली आहे. भारताची FTP सायकल पुढील वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यापासून सुरू होईल. टीम इंडिया या दौऱ्यात २ कसोटी, ३ वनडे आणि २ टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे.

नोव्हेंबर ते जानेवारी २०२४ पर्यंत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ जून २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. तसेच जानेवारी-फेब्रुवारी २०२७ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार आहे. पुढील वर्षात FTP मध्ये आयसीसीच्या ४ मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या वर्ल्ड कपचाही समावेश आहे.


- Advertisement -

हेही वाचा : ठाण्याच्या जांभळीनाक्यावरील दहीहंडीत निष्ठेचे थर, खासदार राजन विचारेंचा शिंदे गटाला टोला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -