लिओनेल मेस्सी आणि रोनाल्डोची घरवापसी!

मेस्सी आणि रोनाल्डो या दोघांचेही भारतातील फॅन-फॉलोविंग पाहता यादोघांच्या विश्वचषकाबाहेर जाण्याने भारतातील फिफाची क्रेझ कमी होईल असा प्रश्न देखील पडला आहे

रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी

फुटबॉल जगतातील सर्वांच्याच मनावर अधिराज्य करणाऱ्या मेस्सी आणि रोनाल्डो या दोघांचेही संघ विश्वचषकाबाहेर गेले आहेत. काल झालेल्या सामन्यात फ्रान्सने अर्जेंटिनाच्या ४-३ च्या फरकाने तर उरूग्वेने पोर्तुगालचा २-१ च्या फरकाने पराभव करत दोघांना विश्वचषकाबाहेर पाठवले आहे. मेस्सी आणि रोनाल्डो या दोघांचेही भारतातील फॅन-फॉलोविंग पाहता यादोघांच्या विश्वचषकाबाहेर जाण्याने भारतातील फिफाची क्रेझ कमी होईल असा प्रश्न देखील पडला आहे.

अर्जेंटिना विरूद्ध मॅक्सीको

सामन्याच्या सुरूवातीलाच फ्रान्सकडून पहिला गोल ग्रीझमनने १३व्या मिनिटाला करत सामन्यातील पहिला गोल नोंदविला. त्यांनतर अर्जेंटिनाच्या डी मारियाने ४१व्या मिनिटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधत हाफ टाईमपूर्वी १-१ असा स्कोर स्कोरबोर्डवर लावला. त्यानंतर सामन्याच्या उत्तरार्धात ४८व्या मिनिटाला मर्क्याडोने गोल केला आणि सामन्यात अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. मात्र लगेचच ५७व्या मिनिटाला फ्रान्सच्या पवार्डने गोल करत सामन्यात फ्रान्सला बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर अवघ्या चार मिनिटाच्या टाईममध्ये फ्रान्सच्या कायलन एमबापे ६४ व्या आणि ६८ व्या मिनिटाला दोन गोल करत फ्रान्सला सामन्यात आघाडी मिळूवून दिली. त्यानंतर अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाच्या अग्युरोने गोल केला खरा मात्र सामन्याअखेर ४-३ या फरकाने अर्जेंटिनाचा पराभव झाला.

argentina vs france
अर्जेंटिना विरूद्ध मॅक्सीको सामन्यातील एक क्षण

उरूग्वे विरूद्ध पोर्तुगाल

उरूग्वेने पोर्तुगालचा २-१ च्या फरकाने पराभव करत सामन्यात विजय मिळवला सामन्याच्या सुरूवातीच्याच ७ व्या मिनिटाला एडिनसन कवानीने गोल करत सामन्यात उरूग्वेला आघाडी मिळवून दिली. यानंतर पोर्तुगालकडून काही आक्रमणे करण्यात आली मात्र एकही आक्रमण यशस्वी झाला नाही हाफ टाईमपर्यंत १-० अशी परिस्थिति सामन्यात होती. यानंतर सामन्याच्या उत्तरार्धात पोर्तुगालच्या पेपेने ५५ व्या मिनीटाला गोल करत पोर्तुगालला सामन्यात बरोबरी मिळवून दिली. मात्र पुढच्या काही मिनिटातच उरूग्वेकडून कवानीने गोल केला. सामन्याच्या ६३ व्या मिनिटाला केलेला हा गोल सामन्यात निर्णायक ठरला आणि उरूग्वेने पोर्तुगालवर २-१ असा विजय मिळवला.

उरूग्वेविरूद्ध पोर्तुगाल सामन्यातील एक क्षण