IPL 2021 : मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफचे भवितव्य ठरवणार कोणत समीकरण ?

Mumbai Indians

आयपीएल २०२१ चा हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. गुरूवारी झालेल्या केकेआर विरूध्द राजस्थानच्या सामन्यात राजस्थानचा दारूण पराभव झाला झाला. त्यामुळे केकेआरचा प्ले-ऑफचा मार्ग सुखकर झाला आहे. पण केकेआरच्या मोठ्या विजयाने मुंबईच्या अडचणीत मोठी वाढ झालेली आहे. केकेआर १४ अंकासह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर तर मुंबई १२ अंकासह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्सचा आज होणारा हैद्राबाद विरूद्धचा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात मुंबईला प्ले-ऑफसाठी मोठ्या विजयाची गरज आहे. मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यात मोठी कामगिरी करता आली तरच मुंबई इंडियन्सच्या रनरेटमध्ये सुधारणा होऊ शकते. अर्थात फक्त गुणांच्या आधारापेक्षा रनरेटवरच सगळ मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफच्या प्रवेशाचे गणित अवलंबून आहे.

काय आहे नेमक समीकरण ?

केकेआरचा नेट रनरेट मुंबईपेक्षा जास्त आहे, त्यामुळे मुंबईला १७० धावांपेक्षा जास्त धावसंख्या राखत मोठ्या विजयाची गरज आहे. मुंबईला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आता वेगवेगळी समीकरणं पुढे येत आहेत. पण मुंबईचा संघ सामना खेळण्याआधी देखील स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो.

नाणेफेक

आजच्या सामन्यातील नाणेफेक महत्त्वाची बाजू ठरणार आहे, जर प्रतिस्पर्धी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला तर मुंबईचे प्ले-ऑफचे स्वप्न तिथेच भंग होणार आहे. मुंबईला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला मोठ्या धावसंख्येचे आव्हान देणे गरजेचे आहे, प्ले-ऑफच्या प्रवेशासाठी १७० हून जास्त धावा राखत विजय मिळवणे मुंबईसाठी मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातील नाणेफेकीकडे सर्व क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मुंबई इंडियन्ससाठी अनुकुल बाब काय ?

मुंबईच्या संघाने आपला अगोदरचा सामना राजस्थान विरूध्द मोठ्या फरकाने जिंकला होता, साहजिकच मुंबईच्या संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. प्रतिस्पर्धी संघ चालू हंगामात सुरूवातीपासूनच पराभवाचा सामना करत आला आहे त्यामुळे ही एक मुंबईसाठी जमेची बाजू असणार आहे. राजस्थान विरूध्दच्या सामन्यात मुंबईच्या संघाकडून चांगली खेळी करण्यात आली होती, तशीच खेळी आजच्या सामन्यात संघाला अपेक्षित आहे

मुंबई इडिंयन्सला काय करावे लागेल…

१) प्रथम नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे असेल.
२) नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करणे.
३) सुरूवातीपासूनच मोठे शॉट्स खेळणे गरजेचे असेल.
४) १७० पेक्षा जास्त धावसंख्येच्या विजयाचे आव्हान असल्याने त्याहून जास्त धावांची उभारणी करणे.
५) दुसऱ्या इनिंग मध्ये सुरूवातीपासूनच आक्रमक गोलंदाजीचा मारा करणे.
६) १७० हून जास्त धावसंख्येने विजय मिळवणे.


हेही वाचा – IPL 2021: उमरानने वेगवान गोलंदाजीत मोडला स्वतःचाच विक्रम, वाचा IPL चे विक्रम