घरक्रीडाArjun Tendulkar : अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई इंडियन्सच्या संघातून अर्जुन तेंडुलकरचं पदार्पण

Arjun Tendulkar : अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई इंडियन्सच्या संघातून अर्जुन तेंडुलकरचं पदार्पण

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मागील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण झाले आहे.

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मागील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण झाले आहे. अर्जुन तेंडुलकर याचं अखेर 2 वर्षांनंतर मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण झालं आहे. (Mi vs kkr ipl mumbai indians sachin tednulkar son arjun tendulkar making his debut against kolkata knight riders at wankhede stadium vvp96)

आयपीएल 16 व्या मोसमातील 22 वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट चाहत्यांना गेल्या 2 वर्षांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण अखेर आला आहे.

- Advertisement -

मुंबईचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आधीच या सामन्यातून बाहेर पडला आहे. जोफ्रा आर्चर 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध संघाचा पहिला सामना खेळला होता परंतु दुखण्यामुळे तो त्यानंतरच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सच्या संघात जोफ्रा आर्चरच्या जागी अर्जुन तेंडुलकरला संधी मिळाली आहे. तर आज मुंबईचे कर्णधारद सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले आहे.

मुंबई इंडियन्स संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.

- Advertisement -

कोलकाता नाइट रायडर्स संघ : नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.


हेही वाचा – जय शाह यांचा पाकिस्तानला जोर का झटका, आशिया चषकवर केलं मोठं विधान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -